
”वडगावात यादव पॅनेल आघाडी विजयी; थेट नगराध्यक्षपदी विद्याताई पोळ
खोची / प्रतिनिधी रोहित डवरी
: महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणारे हातकणंगले तालुक्यातील खोची या गावातील श्री भैरवनाथ एक जागरूक देवस्थान आहे. त्याचा प्रत्येय झालेल्या निवडणुकीमध्ये पेठ वडगाव नगर पालिकेच्या निवडणुकी वेळेला. नुकताच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या गुलाबराव पोळ – यादव यांचे पेठ वडगाव येथील अंबाबाई आणि खोचीच्या श्री भैरवनाथावर श्रद्धा हे सर्वश्रुत आहे. काही दिवसापूर्वी विद्याताई पोळ यांनी प्रचाराची सुरुवात या दोन देवतांना साक्षी ठेवून केली होती यावेळी विद्याताई पोळ यांनी श्रीक्षेत्र खोची येथे जाऊन श्री भैरवनाथ पेठ वडगाव नगरीची सेवा करण्याची संधी मिळावी असा नवस केला होता आणि तो पूर्ण झाल्याची भावना भक्तांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात आहे. निकाला दिवशी विजय गुलाल घेऊन पेटवडगाव नगरीतील पोळ यांचे कार्यकर्ते श्री भैरवनाथाच्या दर्शनासाठी खोची येथे आले होते.वडगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पद व १५ नगरसेवकांच्या जागा जिंकून यादव पॅनेलने सत्ता हस्तगत केली. तर विरोधी जनसुराज्य व ताराराणी आघाडी युतीला ५ जागा मिळाल्या. थेट नगराध्यक्षपदी यादव पॅनेलच्या विद्याताई पोळ या विजय झाल्या. विरोधी युवक क्रांती गटातील नेते अजय थोरात, मोहनलाल माळी विजयी झाले. तर प्रविता सालपे, रंगराव पाटील बावडेकर यांना पराभव पत्करावा लागला.

२ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तब्बल १९ दिवसांनी आज निकाल जाहीर झाला. निकालानंतर यादव पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.थेट नगराध्यक्ष पदासाठी विद्याताई पोळ यांना १०८२७मते मिळाली तर प्रवीता सालपे यांना ८६६२ मते मिळाली. पोळ यांना मिळालेल्या मताची टक्केवारी ५४.४८ इतकी असून सालपे यांना मिळालेल्या मताची टक्केवारी ४३.५८ इतकी आहे. प्रभाग एक मधून जनसुराज्याकडून संतोष चव्हाण हे विजयी झाले. तर त्याच प्रभागात दुसऱ्या जागेवर यादव पॅनल कडून सुरेखा अनुसे या विजयी झाल्या. प्रभाग दोन मध्ये दोन्ही जागेवर यादव पॅनल कडून धनश्री पोळ व मिलिंद सनदी विजयी झाले. प्रभाग तीन मधून एका जागेवर ताराराणी आघाडी कडून अंजली थोरात तर दुसऱ्या जागेवर यादव आघाडी कडून निवास धनवडे हे विजयी झाले. प्रभाग चार मधून एका जागेवर ताराराणी आघाडीकडून मोहनलाल माळी तर दुसऱ्या जागेवर यादव पॅनेल कडून वर्षा पवार विजयी झाल्या. प्रभाग पाच मध्ये दोन्ही जागेवर यादव आघाडी कडून विशाल वडगावे व रूपाली माने विजयी झाल्या. प्रभाग सहा मधून दोन्ही जागेवर यादव पॅनेल कडून कल्पना भोसले व अभिजीत गायकवाड विजय झाले. प्रभाग सात मधून दोन्ही जागेवर यादव पॅनल कडून प्रवीण पाटील व सुषमा पाटील विजयी झाल्या. प्रभाग आठ मधून दोन्ही जागेवर यादव पॅनल कडून जवाहर सलगर व नीला जाधव विजयी झाल्या.प्रभाग नऊ मधून दोन्ही जागेवर यादव आघाडी कडून गुरुप्रसाद यादव व सुमन कोळी विजयी झाल्या. प्रभाग १० मधून दोन्ही जागेवर जनसुराज्य पक्षाकडून अजय थोरात व राजश्री भोपळे विजयी झाल्या.
सभागृहात १५ नगरसेवक नवीन तर ५ जुने दाखल
यादव आघाडी कडून पहिल्यांदाच उमेदवारीची संधी मिळालेले १३ जण यावेळी नगरसेवक झाले आहेत. तर सालपे गटाकडून अंजली थोरात व राजश्री भोपळे हे दोन नगरसेवक पहिल्यांदाच सभागृहात आले आहेत. दरम्यान यादव पॅनल म धील गुरुप्रसाद यादव, जवाहर सलगर या दोन जणांना व युवक क्रांतीकडील अजय थोरात, मोहनलाल माळी, संतोष चव्हाण या तीन जणांना सभागृहात पुन्हा संधी मिळाली आहे.


