प्रभाग क्रमांक ३ मधून अजित तिवडे यांचा प्रचाराचा दिमाखदार शुभारंभ

0
22

कोल्हापूर | प्रतिनिधी : अविनाश काटे

कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधून अजित भगवान तिवडे यांनी आपल्या उमेदवारीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ आज उत्साहात केला. स्वामी समर्थ मंदिर, रुईकर कॉलनी येथे पूजा-अर्चा करून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला.

यानंतर रुईकर कॉलनी, बापट कॅम्प व कुंभार वसाहत या परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत अजित तिवडे यांनी विकासाचा आराखडा मांडला तसेच परिसरातील नागरी समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व युवकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची ग्वाही दिली.

अजित तिवडे हे अजित फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध सेवाभावी उपक्रम राबवत आहेत. गरजूंसाठी मदत, सामाजिक उपक्रम, युवकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम आणि संकटसमयी तत्काळ मदत या कामांमुळे “हाकेला धावणारा नेता” अशी त्यांची ओळख परिसरात निर्माण झाली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसादाच्या रूपाने दिसून येत आहे.

आजच्या प्रचार फेरीत सामाजिक कार्यकर्ते मिलिंद धोंड, शेतकरी संघटनेचे राजेश नाईक, माजी नगरसेवक गौतम जाधव, रविंद्र पोवार, बाबासाहेब मिरशिकारी, अमित तितवे, विशाल सामंत, दीपक जाधव, दत्ता शिंदे, मीरा साते, रमेश आपटे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

प्रचाराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात ही लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here