
प्रतिनिधी :प्रमोद पाटील
सावळकर, कुलकर्णी , काटकर, व्यापारी आघाडीवर
कोल्हापूर दि.२८
मरूधर भवन, गुजरी, कोल्हापूर येथे सुरू असलेल्या वीस वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आज झालेल्या चौथ्या फेरी अखेर आदित्य सावळकर ,अरिन कुलकर्णी, प्रथमेश व्यापारी व संस्कार काटकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत चार पैकी चार गुण प्राप्त केले.
श्री संभवनाथ जैन श्वेतांबर संघ गुजरी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने श्री वेंकटेश्वरा जिल्हा चेस असोसिएशन कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या कै. काशिनाथ मंगल स्मृती बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन आज संपन्न झाले. संघाचे उपाध्यक्ष राजेश निम्बजिया, सचिव उत्तम ओसवाल, राजेश ओसवाल, सौ. रजनी ओसवाल, सौ. डिंपल ओसवाल , सौ रेश्मा ओसवाल, बाबासाहेब मंगल, पुष्पलता मंगल वर्ल्ड चेस ॲालिम्पियाड खेळाडू व श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती खेळाडू,रवि आंबेकर यांच्या हस्ते पटावरील चाल करून संपन्न झाले. प्रथेप्रमाणे सुरुवातीला नमोकार मंत्र, त्यानंतर दिपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले.
तिसऱ्या पटावर अन्वय भिवरे व सारंग पाटील यांचा डाव अनिर्णित राहिला व साडेतीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
सदरच्या स्पर्धेमध्ये 85 स्पर्धक सहभागी झाले असून त्यापैकी आठ खेळाडू आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त आहेत.

