नाट्य क्षेत्राने आरोग्य प्रबोधनातही योगदान घावे – देवेंद्र दिवाण ची हृदय स्पर्श गौरव स्नेहमेळाव्यात हृदयस्पर्श साद

0
14

कोल्हापूर – विविध सामाजिक समस्याना नाट्य क्षेत्राची नेहमीच दूरदृष्टीने प्रबोधनाची मोठी परंपरा 100 वर्षापासून राहिली आहे .आगामी काळात ही आरोग्य प्रबोधनासाठी नाट्य क्षेत्राने आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन रोटरीयन – नाट्यप्रेमी देवेंद्र दिवाण यांनी केले . प्राथमिक जिल्हा फेरीतील 64 व्या राज्य होशी नाट्य स्पर्धेतील विजेते – रंगकर्मी चा गौरव स्नेह मेळावा रोटरी समाज सेवा केंद्र सभागृहात संपन्न झाला . यांचे हृदयस्पर्श परिवाराने आयोजन केला होते .प्रारंभी सर्वाचे स्वागत करताना स्नेह मेळ्याव्याचा उद्देश हृदयस्पर्श चे अध्यक्ष पद्माकर कापसे म्हणाले की ‘ कोल्हापूर ही कलेची पंढरी आहें या कलानगरीत असंख्य कलाकार घडले.स्रिप्ट ते स्क्रीन अशी सर्वांगीण सिनेनिर्मिती याच नगरीत होतं होती. देशभरात कोल्हापूर ची सांस्कृतिक ओळख आहें.पण हीच ओळख थोडीशी संथ होतं आहें ती अधिक जोमाने वाढली पाहिजे ,फक्त राज्य नाट्य स्पर्धे सह वर्षभर विविध उपक्रम सुरू राहिले पाहिजे त्यासाठी त्यामध्ये हृदयस्पर्शी आघाडीने सहभाग असेल असे नमूद केले .या कार्यक्रमात द फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन मुबंई,यशोदर्शन फेडरेशन कोल्हापूर यांनी निर्मिती केलेल्या मृत्युंजयाचे उपासक हा लघुपट दाखविण्यात आला. तसेच कोल्हापूर मेडिकल टुरिझम होण्यासाठी आग्रही आणि सर्वांना यथायोग्य पुरक वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माहिती समन्वयक असलेल्या शायरन संस्थेकडून प्रतिवर्षी प्रकाशित होणाऱ्या सन 2026 साल च्या आरोग्यदिन दिन दर्शिकेचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न होऊन सर्वांना या प्रतीचे वितरण करण्यात आले .
यावेळी रोहन घोरपडे, परसू गावडे, निलेश आवटी, संजय मोहिते अर्चना माने आदींनी मनोगते व्यक्त केली.कोल्हापूरचे नाट्य विश्व एक मोठे कुटुंब असल्याची भावना या सोहळ्याने वाढीस लागते असे प्रतिनिधिक मनोगत यावेळी डॉक्टर राजश्री खटावकर यांनी व्यक्त केले.सावली केअर सेंटर चे किशोर देशपांडे यांनी वैद्यकीय पूरक मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यासाठी कौशल्य केंद्र कोल्हापुरात व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली . संकल्प चे डॉ पी एन कदम कोल्हापूरकरांचा सेवाभाव आणि नाट्यप्रेमींची पदरमोड करून झोकून देण्याची तयारी हे नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे नमूद केले .अभिनेते देवेंद्र चौगुले,यशोदर्शन चे योगेश अग्रवाल, संग्राम पाटील, या मान्यवरांनी स्नेहमेळाव्यामध्ये सहभागी विजेत्यांना गौरविले.
यावेळी सृजनशील रिल स्टार विविध कलागुणांनी देश विख्यात झालेले प्रतीक कांबळे रिया बेतब प्रशान्त सलायचे यांचा विशेष सत्कार करण्यात आला . कोल्हापूर जिल्हा पातळीवरील 64 व्या राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी विजयी झालेल्या संस्था आणि त्यांनी सादर केलेली नाटकें अंतिम फेरीसाठी सादर केली जातील या तिन्हीही संघाना आणि त्यामधील विजेत्यांना हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला…प्रथम क्रमांक नाटकं वसुभूमी दिग्दर्शक संजय मोहिते, द्वितीय क्रमांक नाटकं हायब्रीड दिग्दर्शक परसू गावडे तृतीय क्रमांक नाटकं मी कुमार दिग्दर्शक अभिजित फाटक यांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ ट्रॉफी पुष्पगुछ पुस्तकं मिठाई देऊन गौरविण्यात आले. समयोचित निवेदन सूत्रसंचालन सौ पद्मिनी कापसे यांनी केले.हृदयस्पर्श सोशल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष पद्माकर कापसे सचिव सौ.पद्मिनी कापसे यांनी केले . आंतरराष्ट्रीय क्रीडा लेखक संजय दुधाणे ( पुणे ) आरोग्य मित्र पत्रकार राजेंद्र मकोटे , बजरंग मोरे , आकाशवाणी निवेदिका सीमा मकोटे,नाथाजी मोहिते, राहुल कांबळे,शुभम पाटील,प्रकाश उपाध्ये संजय रणदिवे प्रवीण ओसवाल , ईनर लाईट फाऊंडेशनच्या दिला रा शिकलगार , बजरंग मोरे ,तुषार भिवटे दिपाली औधकर ,दिव्या अष्टपुत्रे ,डॉ कविता बमनजोगी,सौ.भक्ती तेंडोलकर .वंदे मातरम गीतांनी या नाट्य गौरव आणि आरोग्य प्रबोधन सोहळ्याची सांगता झाली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here