कुंभोजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर हटवल्याने तणावहिंदुत्ववादी संघटनांचा गाव बंदचा इशारा;

0
377

प्रतिनिधी : बाहुबली भोसे

कुंभोजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर हटवल्याने तणावहिंदुत्ववादी संघटनांचा गाव बंदचा इशारा; कडक पोलीस बंदोबस्त तैनात**कुंभोज (ता. हातकणंगले) : प्रतिनिधी – बाहुबली भोसे**कुंभोज गावात रस्त्यालगत असलेल्या आरक्षित सार्वजनिक जागेतील छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर अज्ञात व्यक्तींनी हटवल्याच्या घटनेमुळे परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध करत हिंदुत्ववादी संघटना व ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास गाव बंदचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कुंभोज गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुंभोज येथील सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हटवले. ही बाब सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच गावात संतापाची लाट उसळली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करत शिवप्रेमी, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने दसरा चौकातून गावात फेरी काढण्यात आली.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही,” अशा घोषणा देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या आंदोलनाला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत कुंभोज गाव बंद ठेवण्यात आले.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला. कुंभोज परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागवण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णतः सतर्क आहे. नागरिकांनी शांतता व संयम राखावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.या प्रकरणाचा तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आले आहे.दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गावातील सर्व प्रतिष्ठित व मान्यवर व्यक्तींनी घटनास्थळी भेट देऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पोलीस निरीक्षक शरद नेमाने यांच्यासह पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या घटनेमुळे कुंभोजमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here