
प्रतिनिधी : जानवी घोगळे
व्हीव्ही इन्स्टिट्यूट ऑफ स्किल अँड लीडरशिप’चे 30 डिसेंबर रोजी भव्य उद्घाटन
मुंबई | लोअर परेल | 30 डिसेंबर 2025 :
देशसेवा, शिस्त, नेतृत्व आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास या मूलभूत मूल्यांवर आधारित ‘व्हीव्ही इन्स्टिट्यूट ऑफ स्किल अँड लीडरशिप’ या अत्याधुनिक प्रशिक्षण संस्थेचे 30 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील लोअर परेल येथे भव्य उद्घाटन होत आहे. विशेष म्हणजे, मुंबई शहरात प्रथमच सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) व राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) प्रशिक्षणासाठी पूर्णपणे समर्पित असे हे केंद्र सुरू होत असून, संरक्षण दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
या संस्थेची संयुक्तपणे स्थापना ले. कर्नल (डॉ.) डी. डी. गोयल (निवृत्त) आणि सौ. अंजली साखरे यांनी केली आहे.
ले. कर्नल (डॉ.) गोयल हे युद्धात जखमी झालेले माजी सैनिक, अनुभवी SSB मेंटॉर, कॉर्पोरेट ट्रेनर आणि लेखक असून त्यांनी भारतीय सैन्य अकादमी (IMA) आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) येथे प्रशिक्षक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आहे.
संस्थेच्या संस्थापिका सौ. अंजली साखरे या सैैनिक कन्या असून त्या प्रख्यात वक्त्या, कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम प्रमुख, तसेच MSME सक्षमीकरण तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात.
सैनिकांच्या मूल्यांवर आधारित नेतृत्व घडवण्याचा संकल्प
‘व्हीव्ही इन्स्टिट्यूट ऑफ स्किल अँड लीडरशिप’चे वैशिष्ट्य म्हणजे सैनिकांच्या शिस्तबद्ध मानसिकतेचा, नेतृत्वगुणांचा आणि मूल्याधारित व्यक्तिमत्त्वाचा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करणे.
सैनिकांची मानसिक ताकद, निर्णयक्षमता, जबाबदारीची भावना आणि राष्ट्रप्रेम या गुणांमुळे समाज अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि सकारात्मक दिशेने जाऊ शकतो, असा ठाम विश्वास संस्थापकांनी व्यक्त केला आहे.
९ प्रमुख क्षेत्रांमध्ये सर्वांगीण प्रशिक्षण
या संस्थेमार्फत SSB व NDA इच्छुक उमेदवारांसाठी केवळ परीक्षा-केंद्रित नव्हे, तर अधिकारी घडवणारे सर्वांगीण प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये पुढील ९ प्रमुख व्हर्टिकल्स अंतर्गत प्रशिक्षणाचा समावेश आहे —
- SSB व NDA संपूर्ण प्रशिक्षण
- नेतृत्व विकास (Leadership Development)
- व्यक्तिमत्त्व विकास व समृद्धी
- संवाद व प्रभावी अभिव्यक्ती कौशल्ये
- तणाव व्यवस्थापन व मानसिक दृढता
- युवक व महिला सक्षमीकरण
- MSME व उद्योजक नेतृत्व प्रशिक्षण
- कॉर्पोरेट उत्कृष्टता प्रशिक्षण
- करिअर मार्गदर्शन व समुपदेशन
प्रशिक्षणामध्ये केवळ निवड प्रक्रियेपुरते मर्यादित न राहता चारित्र्य, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि सामाजिक जबाबदारी या अधिकाऱ्यांच्या मूलभूत गुणांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती, मोठा प्रतिसाद
या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक निवृत्त व कार्यरत संरक्षण अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
देशासाठी सक्षम, मूल्यनिष्ठ आणि जबाबदार नेतृत्व घडवण्याचे कार्य ‘व्हीव्ही इन्स्टिट्यूट ऑफ स्किल अँड लीडरशिप’ निश्चितच करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी व प्रवेश चौकशीसाठी संपर्क :
📞 9152151296

