
सर्व निवड झालेले व बक्षीस विजेते खेळाडू सोबत मान्यवर पाहुणे, संयोजक व पंच
प्रतिनिधी :प्रमोद पाटील
कोल्हापूरचा वेंकटेश खाडे पाटील उपविजेता तर अर्णव पोर्लेकर तृतीय कोल्हापूर सोमवार दिनांक 5 जानेवारी :- अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा खुल्या अमॅच्युर निवड बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित इचलकरंजीच्या शौर्य बगडीया ने सात पैकी सहा गुण व 31 टायब्रेक गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. अग्रमानांकित कोल्हापूरचा व्यंकटेश खाडे पाटील ने सहा गुण व 29 टायब्रेक गुणासह उपविजेतेपद मिळविले तर दहावा मानांकित कोल्हापूरचा अर्णव पोर्लेकर सहा गुण व 28 टायब्रेक गुण घेत तृतीय स्थान निश्चित केले. तन्मय पवार (इचलकरंजी), प्रज्वल मुधाळे (हुपरी) व संस्कार काटकर (कोल्हापूर) हे तिघेजण साडेपाच गुण व सरस टायब्रेक गुणानुसार अनुक्रमे चौथ्या, पाचव्या व सहाव्या स्थानी आले. या सहा जणांची निवड रत्नागिरी येथे 16 ते 18 जानेवारी दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य खुल्या अमॅच्युर निवड आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात करण्यात आली आहे. स्विस लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात घेण्यात आलेल्या या निवड स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित 76 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते.या स्पर्धेसाठी युनिव्हर्सल सेक्युरिटी सिस्टीम चे कॅप्टन उत्तम पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ विनय ठक्कर व प्रियांका ढोले यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, उपाध्यक्ष धीरज वैद्य, वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ व विजय सलगर उपस्थित होते. उत्तेजनार्थ बक्षीसे उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू 1) स्नेहल गावडे कोल्हापूर 2) वेदिका मदने कोल्हापूर 3) हर्षदा सूर्यवंशी पाटील कोल्हापूर पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट – राजदीप पाटील कोल्हापूर, तेरा वर्षाखालील उत्कृष्ट – सिद्धी कर्वे जयसिंगपूर, अकरा वर्षाखालील उत्कर्ष – वन्शील ठक्कर कोल्हापूर , नऊ वर्षाखालील उत्कृष्ट अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर व सात वर्षाखालील उत्कृष्ट – रिशान पिळणकर कोल्हापूर

