
कोल्हापूर पत्रकार असोसिएशनतर्फे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर :प्रतिनिधी : प्रमोद पाटील
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज ६ जानेवारी मराठी पत्रकार दिन कोल्हापूर पत्रकार असोसिएशनच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. असोसिएशनच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार ताज मुलानी, महापालिकेचे माजी अधिकारी तानाजी कवाळे तसेच दैनिक बंधुताचे कोल्हापूर आवृत्ती संपादक मिलिंद प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होते.
प्रारंभिक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
प्रसंगी पत्रकारांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार ताज मुलानी म्हणाले, “पत्रकारितेच्या क्षेत्रात आज अनेक आव्हाने उभी आहेत. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत बदलतं तंत्रज्ञान स्वीकारणं गरजेचं आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत पत्रकारितेतील विश्वासार्हता अबाधित ठेवणं ही काळाची गरज आहे.”
वरिष्ठ पत्रकार व दैनिक बंधुताचे कोल्हापूर आवृत्ती संपादक मिलिंद प्रधान यांनीही काळानुसार बदलणाऱ्या पत्रकारीते बरोबरच पत्रकारांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी. आपला पत्रकारितेतील दर्जा कायम राखणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तानाजी कवाळे यांनी आपल्या सेवाकाळातील पत्रकारितेचे अनुभव सांगत पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील नातेसंबंधांवर भाष्य केलं. यावेळी युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केल.
या कार्यक्रमाला कोल्हापूर पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष डॉ. युवराज मोरे, सचिव सागर ठाणेकर, अविनाश काटे तसेच नियाज जमादार, रविराज कांबळे, अविनाश शेलार, युवराज राऊत, श्रावण खांडेकर आदींसह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.

