झंवर ग्रुप पुरस्कृत चेंबर चषक क्रिकेट स्पर्धेचा टी-शर्ट अनावरण संपन्न;चेंबरच्या संलग्न १७ संघटनांचा स्पर्धेत सहभाग

0
19

प्रतिनिधी : प्रमोद पाटील

कोल्हापूर दि. ५ : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने संलग्न संघटना यांचेमध्ये झंवर ग्रुप पुरस्कृत चेंबर चषक क्रिकेट स्पर्धेचे दि. ९, १० व ११ जानेवारी २०२६ रोजी शास्त्रीनगर मैदान, कोल्हापूर येथे आयोजन केले आहे. आज टी शर्टचे अनावरण झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे व्यवस्थापकीय संचालक नीरज झंवर यांच्या हस्ते करण्यात झाले. स्पर्धेमध्ये १७ व्यापारी व औद्योगिक संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक झंवर ग्रुप असून जाधव इंडस्ट्रीज सह प्रायोजक आहेत. तर कोल्हापूर हॉटेल मालक संघ, अमित आर मेडिकल, इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशन, संजय घोडावत ग्रुप, वर्धमान इलेक्ट्रीकल्स, रिटा आईस्क्रीम फॅक्टरी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि. ९ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वा. मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण रविवार दि. ११ जानेवारी रोजी दुपारी ४.०० वाजता खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार आहे.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सहभागी सर्व असोसिएशनच्या प्रतिनिधींचे स्वागत करत व्यापारी-उद्योजकांनी रोजच्या ताणतणाव जीवनापासून मुक्त राहून खेळकरवृत्ती जोपासण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते असे सांगितले. स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष असून मागील पाचही स्पर्धा आनंदाच्या वातावरणात खेळीमेळीत पार पडल्याचे सांगितले. त्यानंतर स्पर्धेसाठी असणाऱ्या नियम आणि अटी सांगून स्पर्धेचे लॉटस् पाडले व सामने जाहीर केले.
झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक नीरज झंवर यांनी व्यापारी-उद्योजक कामाच्या व्यापातून वेळ काढत क्रिकेट स्पर्धेत भाग घेत असलेबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व सदर क्रिकेट स्पर्धा व्यापारी-उद्योजकांची एकमेकांची ओळख होण्याचे व्यासपीठ बनेल असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या. व्यापारी-उद्योजकांनी दिवसातील थोडा वेळ आरोग्यासाठी द्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष राजू पाटील, चेंबरचे मानद सचिव प्रशांत शिंदे, वैभव सावर्डेकर, चेंबरच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष संपत पाटील, धनंजय दु्ग्गे, शिवाजीराव पोवार, राहुल नष्टे, प्रकाश पुणेकर, इंद्रजीत चव्हाण, अविनाश नासिपुडे, विनोद पटेल, अनिल धडाम, विजय नारायणपुरे तसेच सहभागी संघटनांचे प्रतिनिधी व कप्तान उपस्थित होते.आभार राजू पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here