
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
गेली वीस वर्षे कोल्हापूर शहराच्या विकासाच्या बाबतीत सत्तेत व विरोधात असणारे युवा नेते आज एकमेकांच्या विरोधात महापालिकेची निवडणुक आली की शड्डू ठोकतात व निकाल लागल्यानंतर मोजक्याच नगरसेवकांच्या हातात कारभार देतात. मग सांगा विकास कसा होणार? नागरीकांचे मूलभूत प्रश्न सोडविणे ही नगरसेवक यांची कामे आहेत. युवा नेत्यांना शहराच्या विकासाची जबाबदारी घेऊन त्यांनी आज अखेर काय काम केले यावर नागरिकांनी चिंतन केले पाहिजे. शहर म्ह णजे उद्योग /रोजगार निर्मितीचे केंद्र असते मग या युवा नेत्यांनी कोल्हापूर शहरातील कोणते उद्योग / रोजगार निर्मितीसाठी कोणते प्रयत्न केले व नागरिकांना कोणते उद्योग व रोजगार उपलब्ध करून दिले आहेत यावर कोण चर्चा करत नाहीत.
निवडणुकीमध्ये नागरीकांची दिशाभूल करून निवडणूक जिंकणे हा त्यांचा उद्योग आहे. आपण नागरिक म्हणून आजचा युवा वर्ग विचारच करत नाही. आजचे युवक तर त्यांच्या आहारी गेले आहेत. या सिस्टीम मधून कधी युवा वर्ग बाहेर पडणार? प्रत्येक नागरिकांनी खालील मुद्द्यांवर या युवा नेत्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. खालील प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका स्पष्ट करणार आहे का नाही ते विचारले पाहिजे. पुढील काळात या दोघांना पर्याय म्हणून कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आमच्या पक्षाच्या तिस-या आघाडीच पर्याय नागरिकांनी तपासुन पहावा. कारण आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरच शहरातील नागरीकांसमोर आलो आहोत ते मुद्दे खालील प्रमाण आहेत.
मुंबई, पुणे, नाशिक, कगपुर, सोलापूर इ शहराची २७ वेळा हद्दवाढ होते मग कोल्हापूरची का नाही. आपली हद्दवाढ २७ वेळ व्हायची असेल तर कोल्हापूर महानगरपालिका नवीन कार्यकारिणी स्थापण होईल. पहिल्याच महासभेत कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चा ठराव करावा लागेल. जर शहराचा विकास करावयाचा होता तर हद्दवाढ साठी युवकांचे आधारस्तंभ युवा नेते का एकत्र आले नाहीत?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा पुढील २ ते ३ वर्षे हद्दवाढसाठी निर्णय घेवू शकणार नाहीत हे निश्चित आहे. कोल्हापूर शहरातील नागरिकांना शहरातील समस्यांची सत्य परिस्थिती दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. पुढील कमीत कमी ८ ते १० वर्षे कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे असंभव आहे हे सत्य व खरी बाजू आहे. कोल्हापूर शहरातील नागरिकांनी प्रथमता अभ्यासपूर्वक व कायदेशीर बाजू लक्षात घेतली पाहिजे. तरच पुढील ८ ते १० वर्षात कोल्हापूर शहराचा विकास मेट्रोसिटीमुळेच होणार आहे. सध्या आम्ही KMRDA चा भाग १ एक प्रसारीत केला आहे. दुस-या व्हीडीओ मध्ये जिल्हा व शहराच्या विकासाचे सादरीकरण करणार आहोत तर तिस-या व्हीडीओ मध्ये विकासासाठी राज्य शासन, केंद्र शासन व KMRDA कसा निधी देवु शकते याचे सादरीकरण करणार आहोत. यानंतर जिल्हयातील व शहरातील प्रत्येक
कुटूंबाला फायदा होईल. याची आम्ही हमी खात्री देतो. २) कोल्हापूर मेट्रोसिटी झालीच पाहिजे यासाठी कोल्हापुर महानगर विकास क्षेत्र प्राधिकरण (KM) मेट्रोसिटी स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
३)म्हाडा व सिडको प्रकल्प राबवुन सामान्य नागरीकांना घरे तसेच शहरातील ३० मीटरचे, डी.पी.प्लॅन मधील व शहराच्या बाहेरील २० कि. मी. परिसरातील ३० मीटर रस्ते करण्याचा प्रयत्न करणार
४) छत्रपती शाहु मिलच्या जागेमध्ये सांस्कृतिक वारसा डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करणार शहरालगतच्या ५ कि.मी. परिसरात महानगर पालिकेच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणार. तसेच महानगर पालिकेची वर्षातून एकदा तरी नागरीकांच्या मुलभुत प्रश्नासाठी महासभा घेण्याची प्रथा चालू करण्याचा प्रयत्न करणार. महासभा म्हणजे शहरातील सर्व नागरीकांना एकत्रीत करून प्रशासनावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करणार
५) शहरातील टी.पी. स्किम १ ते ५ मंजूर आहेत. परंतु त्याची प्रक्रीया आज अखेर पूर्ण नाही. त्याच्यासह शहरातील उर्वरित संपूर्ण क्षेत्रात शासनाकडून नोटीफीकेशन काढून प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार
६) आलेल्या पाहुण्यांचं भारदस्त स्वागत करणं, ही आपली परंपराच आहे. त्यामुळे आता शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर भव्य दिव्य अशा स्वागत कमानी उभारल्या जाव्यात आणि त्यावर कोल्हापुरच्या परंपरेच, संस्कृतीचं प्रतिबिंब असावं. कोल्हापुरच्या बहुतेक प्रमुख चौकांना एक इतिहास आहे. जसं दसरा चौक हे संस्कृती, नाटय साहित्य अशा विविध क्षेत्रांचे प्रतिक आहे, त्याच पध्दतीनं अन्य चौकांना एक महत्व आहे. त्यामुळे अशा सर्वच चौकांचं सुशोभीकरण करण्यात यावे, जेणेकरून येणा-या पर्यटकांना कोल्हापुरचा अभिमानास्पद वारसा समजेल.
७) आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी स्वतंत्रपणे स्मशानभुमी देण्यात यावी. यासाठी शासणानं शंभर एकर जागा उपलब्ध करून द्यावी.
त्यामुळे आपण बदलूया कोल्हापूर बदलेल. म्हणूनच आम्ही म्हणतोय तेच खर होणार हे निश्वित आहे. मेट्रोसीटी का गरजेची आहे त्याबद्दल प्रत्येक प्रभागात जनजागृती करणार आहे, तसेच नागरिकांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधणार आहोत
वरील सर्व प्रश्न आघाडीच्या वतीने व नागरिकांच्या सहकार्याने कायमपणे सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा या पत्रकार। कार परिषदेत एस फोर ए विकास आघाडीच्या वतीने श्री. राजू माने यांनी सांगितले पत्रकार परिषदेस आघाडीचे खजानिस श्री. विकास यादव, श्री. श्रीकांत बामणे, श्री. शशिकांत पाटील, श्री. रूपेश घडशी, श्री. दत्तात्रय माने उपस्थित होते.

