प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
राधानगरी-दाजीपूर अभयारण्याच्या पर्यटन विकासाला अत्यंत उपयुक्त ठरणारे
दाजीपुरातील ‘हॉलिडे रिसॉर्ट’ यंदाच्या पर्यटन हंगामात पर्यटकांसाठी खुले होण्याच्या दृष्टीने दर्जेदार आणि गतीने काम करण्याची आखणी करावी अशी सूचना एम.टी.डी.सी. या वेळी अधिकाऱ्यांना आमदार प्रकाश आबिटकरानी केल्या.
‘थ्री स्टार’ दर्जाच्या सुविधा असणारे रिसॉर्ट चे काम करताना योजनेच्या पहिल्या टप्प्यातील रिसॉर्टची मुख्य इमारत आणि उपहारगृह इमारत व अंतर्गत बाकी कामे ऑक्टोबर अखेर पर्यंत पूर्ण होतील.
दुसऱ्या टप्प्यातील स्विमिंग पूल, लँण्ड स्केपिंग, रिसॉर्टस्थळ सभोवतील संरक्षक भिंत, प्रवेशव्दार कमान, क्षेत्र सुशोभीकरण, वाहनतळ, टेरेस, कॅफे आदी प्रस्तावित कामे नोव्हेंबर महिन्यात सुरू होतील.
यावेळी एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता विजय बावधने, ठेकेदार सुजित गायकवाड, दाजीपूरचे माजी सरपंच सुभाष पाटील, दीपक शेट्टी, सचिन पालकर, विश्वास राऊत, भैया वागरे आदी उपस्थित होते.