पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हिराबेन यांचा इचलकरंजीजवळ अर्धपुतळा

0
227

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : इचलकरंजीपासून ५ किलोमीटरवर असलेल्या खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील गजानन महाराज मंदिर परिसरात महाराष्ट्रात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री स्व.

हिराबेन मोदी यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. भारतमाता आणि गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचेही अर्धपुतळे साकारण्यात आले आहेत.

खोतवाडी येथील गजानन महाराज मंदिराला ब तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या ठिकाणी भारतमातेची २१ फूट भव्य मूर्ती, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारलेला ७५ फूट उंच ध्वजस्तंभ तसेच विविध क्रांतिकारकांची शिल्पे आणि दोन भलेमोठे हत्ती साकारण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here