Kolhapur: शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह पाटील, उपाध्यक्षपदी राजसिंह शेळके

0
56

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीणसिंह विश्वनाथ पाटील (मुरगूड) यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे राजसिंह भगवानराव शेळके (कोल्हापूर) यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली.

अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे होते. यावेळी सहकार विभागाचे अधिकारी मिलिंद ओतारी उपस्थित होते.

अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव ज्येेष्ठ संचालक जी. डी. पाटील यांनी सुचवले, त्यास अमरसिंह माने यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी शेळके यांचे नाव ॲड. दत्तात्रय राणे यांनी सुचवले त्यास सर्जेराव देसाई यांनी अनुमोदन दिले.

नूतन अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, शेतकरी संघ आणि मुरगूडकर पाटील कुटुंब यांचे नाते वेगळे आहे. संघाचे माजी अध्यक्ष विश्वनाथराव पाटील यांच्या नावाला बट्टा लागेल, असे काम माझ्या हातून होणार नाही. अध्यक्षपदाची खुर्ची माझ्यासाठी महत्त्वाची नाही, कोणत्याही दबावाला बळी न पडता संघाला ऊर्जितावस्थेत आणण्याची शपथ घेऊनच खुर्चीवर बसलो आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. यावेळी अजितसिंह मोहिते, अमरसिंह माने, राजेंद्र पाटील-टाकवडेकर, सुनील मोदी, ॲड. दत्तात्रय राणे, अपर्णा पाटील, माजी अध्यक्ष युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संघाचे मुख्य व्यवस्थापक सचिन सरनोबत, चिटणीस जावेद मुलाणी, कर्मचारी संघटनेचे नेते दीपक निंबाळकर, अनंत देसाई आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here