गावालगत मध्यरात्री ऊस वाहतूक करणारा सलीम नामक वाहकाने भूताला पाहिल्याचे व त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने गावात भूतांच्या चर्चेला उत आला आहे.
तीन दिवस गावभर सोशल मीडियावर भूतांचा फोटो फिरत असल्याने प्रत्येक कोपऱ्यावर व घरात चर्चा सुरू असून भितीपोटी शेतकरी रात्रपाळी पाणी लावण्यास धाजवत तर आहेत पण घराघरात चर्चेने बालकवर्गाचे भितीने गाळण उडले आहे.
रूई माणगाव हा पाणंद रस्ता असून या रस्त्यावरून ऊस वाहतूक होते, या मार्गालगत ‘डबान’ नामक शेती असून विस्तार्ण असे पाण्याचा डोह आहे .या डोहालगत भुतांचा वावर असल्याचे चर्चा पूर्वापांर पासून आहे. गुरुवारी (दि १) ऊस कारखान्यास पोहचवून मध्यरात्री सलीम नामक चालक परत येत असताना या मार्गावर त्याला भूत दिसले. भूतांचा फोटो सोशल मिडियावर प्रसारित झाला आणि गावभर चर्चेला ऊत आला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रात्री अपरात्री शेतीपंप चालू करणेस व शेतीला पाणी देण्यास एकटेच जाण्याचे धाडस होईना.
अफवेवर विश्वास ठेवू नका
मी गेली तीस, चाळीस वर्ष डबान लगत शेती करत असून कधीच भूत पाहिले नाही. नागरिकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये. अज्ञाताकडून उस पेटवा पेटवी सुरू असून याला पायबंद बसावा याकरिता कोणीतरी अफवा उठविल्याची शक्यता आहे – शरद पाटील, आदू पाटील- शेतकरी