सातार्डे ता. पन्हाळा येथील श्रीकृष्ण ॲग्री डायट गुळ पावडर कारखान्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिले निवेदन

0
113

सातार्डे ता. पन्हाळा येथे श्रीकृष्ण ॲग्री डायट या ऊस कारखान्यामध्ये गुळ पावडर उत्पादनाच्या हेतूने उसाचे गाळप सुरू आहे

तरी तोडलेला ऊस गाळप करून पुढील ऊस गाळप थांबवण्यात यावे या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने श्रीकृष्ण ॲग्री डायट चे अध्यक्ष के एस चौगुले यांच्याकडे दिले आहे

या निवेदनामध्ये म्हटले आहे की २०२३/२४ या हंगामासाठीचा ऊस दराचा प्रश्न अद्यापही मिटलेला नसून २०२२/२३ या हंगामातील ४०० रुपयांचा हप्ता देण्यात यावा याबाबत विविध कारखान्यांना निवेदन दिले आहे.

तरी आपण मागील हंगामातील ४०० रुपयांचा हप्ता द्यावा व या हंगामामध्ये ४००० रुपये दर जाहीर करून गाळप हंगाम सुरू करावा

अशा आशयाचे निवेदन दिले आहेयावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष विक्रम पाटील रामभाऊ चेचर दगडू गुरवळ महादेव झेंडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here