प्रतिनिधी संजय पाटील रामभक्त हनूमानास मारुती व बजरंगबली या नावानेही संबोधतात.
पन्हाळा तालूक्यातील उत्रे गावचे जागृत ग्रामदैवत हनूमान देवस्थान हनूमान मूर्ती, प्राचीन काळातील मुर्ती कलाकसूर करुन उभारलेले अप्रतिम व प्रसिध्द मंदीर अशा विविध वैशिष्टयानी प्रसिध्द असलेले मंदीर अनेक भक्तांना भूरळ टाकत असून देशभरात याचा नांवलौकिक वाढलेला आहे.
या देवस्थानाला अनेक भक्तगण भेटीस येतात. हनूमान मंदीर हे गावतील गावच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले आहे.गावात प्रवेश केल्यावर मंदीराचा कळस व त्यानंतर खालील भाग दिसू लागतो.
मंदीराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्यांनी केली आहे. गावात असलेल्या .या मंदीरातील मूर्ती दक्षिणाभिमुख असल्याने जागृत व नवसाला पावणारी अशी ख्याती आहे.
मंदिरात विठ्ठल रखुमाई, दत्तगुरू, महादेव पिंड, तुलसी वृंदावन,डकमाळ, नागदेव, आदी सह, बाबा महाराज आरविकर, अनंत स्वामी,व इतर मुर्ती आहेत.
1992 पासुन मारुती मंदिर समितीचे मार्गदर्शन खाली भव्य दिव्य मंदिर साकारले आहे. हनूमानाच्या स्वयंभू मुर्तीचे मंदीर आहे.
याच परिसरात ग्रामपंचायत भवन आहे. गाव कासारी नदी काठावर वसलेले आहे.
व हाटकोबा खडीचा आकार महादेव पिंडी सारखा आहे..मंदीराचे पिढीजात गुरव बंधु भक्तीभावाने पुजा अर्चा करतात.
तसेच नाना जेरे मंदीरातील अभिषेक व पुजा अर्चा करतात , व गुरव समाज ही देवाची आरती करतात.
गावच्या हनूमानाची मूर्ती वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण आहे.त्यामूळे या गावातील मूर्ती सर्वत्र प्रसिद्ध आहे. आज पर्यंत न्युज चॅनलवर, सोशल मिडिया, वृत्तसंस्था, यांनी देशभरात प्रसिद्धी मिळाली आहे.
भक्तांना पावणारा,श्रध्देला पावन होणारा, गावचा रक्षणकर्ता , पालनकर्ता ,संकटनिवारणकर्ता म्हणून भक्त गण दर शनिवारी मनोभावे पूजन करतात.पूजेसाठी रुईच्या पानाची माळ,उडीद,तेल मीठआदी वहातात.
मंदीरातीलमूर्ती एकाच पाषाणात कोरली आहे..गाभाऱ्यात प्रसन्न,शांत,स्वच्छ व ताजेतवाने वाटते.मंदीराच्या बांधकामाची दिव्यता,भव्यता लक्षात येते. आतील मंदीराचा कळसाचा गोलाकार भाग पाहील्यानंतर कोरीव कला व कोरीव काम आकर्षक व गावाच्या वैभवात भर घालते.पन्हाळा गडावर वास्तव्य असलेले . पाराशर रुशी यांच्या पावन स्पर्शाने ही भुमी पवित्र आहे. जोतिबा महात्म्य या ग्रंथात गावाचा व पिंडीचा उल्लेख आढळतो. मंदीरातील टापटीपपणा व शांतता देवाचे महातम्य निश्चित वाढवते.लोकांची प्रचंड श्रध्दा आहे.दसरा सणात नऊ दिवस नवरात्री उत्सव साजरा होतो.
नऊ दिवस लोक मंदीरात असतात. यावेळी भजन, किर्तन, प्रवचन, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच मंदीरात सकाळी व संध्याकाळी आरती पूजा होते.लोक मनोभावे पूजा करतात.नवरात्रीचे नऊ दिवस लोक मंदीरात राहतात.जागरणावेळी पालखी निघते.हनूमानजयंती उत्सव , अष्टमी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होतो.गावातील गल्लीतून देवाची मिरवणूक निघते.मोठया प्रमाणात महाप्रसाद वाटप होतो.देवासाठी पालखी आकर्षक बनवली आहे. देवाच्या मंदिर उभारणीसाठी चित्रपट दिग्दर्शक व गावचे अशोक गायकवाड व कुटुंबातील सदस्य, जेष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित, जॉकी श्रॉफ, आदी सह खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, विविध अधिकारी, भक्त, गावकरी यांच्या सहकार्याने भव्य दिव्य मंदिर उभारले आहे. पन्हाळा तालूक्यातील ह पहिलेच गांव आहे. येथे हनूमानावर नितांत श्रध्दा आहे..आपल्या मागाण्या पूर्ण होऊ दे म्हणून आशिर्वाद घेतात व नवस बोलतात.नवस पूर्ण झाल्यास विविध स्वरुपात देवास भेट देऊन फेडतात.पूर्वी वळू वहाण्याची पध्दत होती ती आता नाही..लोक शनिवार पाळक पाळतात म्हणजे कामाला सूट्टी घेतात.नवरात्र काळात आरती, भजन, किर्तन, प्रवचन,व्याख्यान,अध्यात्मिक वाचन असे कार्यक्रम होतात.अनेक भक्तगण माहेरवाशीन तेल नारळ वहाण्यासाठी येतात.हनूमान मंदीर गावातील सामाजिक, राजकीय , शैक्षणिक, सांस्कृतिक , आर्थिक,कृषीविषयक,अनेक निर्णय यांचे साक्षीदार असल्याने प्रत्येकाच्या मनामनात मंदीराची स्मृती आहे.शनिवारी नित्यनियमाने लोक आरती करतात.गावात एकोपा निर्माण करण्यासाठी व शांतता राखण्यासाठी व गावाच्या विकासासाठी सातत्याने आधुनिकतेची कास धरून प्रगती केली जात आहे . ही गावची परंपरा कायम जपली जाणार यासाठी गावकऱ्यांचे सदैव प्रयत्न आहेत.