गोकुळ दूध उत्पादन संघाकडून ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे आवाहन

0
112

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाकडून दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धेचे आयोजन करण्यात येते.

यंदा ही संस्थांचे दूध उत्पादक सभासदांसाठी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हैशी व गाईसाठी ‘गोकुळ श्री’ स्पर्धा आयोजित केली आहे. सदरची ‘गोकुळ श्री’ स्पर्धा दि.२०नोव्हे २०२३ ते ३०नोव्हेबर २०२३ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूध उत्पादक यांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर चेअरमन-सचिव यांच्या सही शिक्क्यानिशी संघाचे बोरवडे,लिंगनूर,तावरेवाडी,गोगवे,शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात दि.११ नोव्हेंबर २०२३ पर्यत नोंदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हैस कमीत कमी १२ लिटर प्रतिदिन व गाय २० लिटर प्रतिदिन दूध देणारी असणे आवश्यक आहे.

सदर स्पर्धेतील विजेत्यांना म्हैस १ ते ३ क्र व गाय १ ते ३ क्र अशा ६ क्रमाकांना बक्षीस, पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन ‘गोकुळ श्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बक्षीसाची रक्कम पुढीलप्रमाणे. प्रथम क्रमांक म्हैस :३० हजार ,प्रथम क्रमांक गाय :२५ हजार, द्वितीय क्रमांक म्हैस :२५ हजार, द्वितीय क्रमांक गाय :२० हजार, तुतीय क्रमांक म्हैस :२० हजार, तुतीय क्रमांक गाय :१५ हजार स्पर्धेची संबंधित माहिती दूध संस्थांना परिपत्रका द्ववारे कळवण्यात आली असुन दूध उत्पादन सभासदांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गोकुळ दूध उत्पादन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here