प्रतिनिधी – सुदर्शन पाटील
बंदीजणांनी तयार केलेल्या वस्तू जनतेपर्यंत पोहोचाव्यात व बंदीजणांविषयी सामान्य माणसाच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर होऊन त्यांच्याविषयी असणारे मतपरिवर्तन व्हावे या हेतूने कळंबा येथील कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहामध्ये दिवाळी मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे उद्घाटन कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की कारागृहामध्ये मोबाईल, ड्रग सापडणे कैदी पळून जाणे यासारख्या प्रकारामुळे कारागृह प्रशासनाची मान खाली जाते त्यामुळे असे प्रकार घडू नयेत यासाठी अधिकाऱ्यांनी कर्तव्यदक्ष राहून या सर्व समस्यांवरती मात करून आपले काम प्रामाणिकपणे करावे व आपली प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामधे येथील सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष राहुन आपले कर्तव्य बजावावे असेही ते यावेळी म्हणाले याचबरोबर कारागृहातील बंदीजणांना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
कारागृह बंदीजणांनी बनवलेल्या वस्तू प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कारागृह प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे
यावेळी अभिनेत्री मंजुषा खत्री
1) मा अधीक्षक श्री. पांडुरंग भुसारे सो
2) उपअधीक्षक श्री. साहेबराव आडे सो
5) वरीष्ठ तुरुंग अधिकारी – श्री. सतिश कदम.
4) वरीष्ठ तुरुंग अधिकारी – श्री. सोमनाथ मस्के
5)कारखाना व्यवस्थापक – श्रीमती शैला वाघ
6)वरीष्ठ तुरुंग अधिकारी श्री चंद्रशेखर देवकर
7) कारखाना तूरुंग अधिकारी – श्री. प्रविण औढेकर
8) तुरुंग अधिकारी श्री. अविनाश भोई.
9) तुरुंग अधिकारी श्री. विठ्ठल शिंदे
आदी उपस्थित होते