राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथील ग्रामपंचायततिच्या निवडणुकीमध्ये सीमा नितीन हिर्डेकर यांना मतदारांनी विजयी कौल दिला असून श्री भोगेश्वर मोताईदेवी भराडीदेवी संयुक्त ग्रामविकास आघाडीने सरपंच पदासह सर्व दहाच्या दहा जागा जिंकत बाजार भोगाव ग्रामपंचायत वरती एक हाती सत्ता मिळवली आहे
येथील ग्रामपंचायतची लढत तिरंगी होत असल्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या ग्रामपंचायतीकडे लागले होते मात्र भोगेश्वर मोताईदेवी भराडी देवी संयुक्त ग्रामविकास आघाडीने सर्व दहाच्या दहा जागा मिळवत ग्रामपंचायत वरती आपले निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे यामध्ये सरपंच पदी सीमा नितीन हिर्डेकर यांची सरपंच पदी वर्मी लागली असून
प्रभाग क्रमांक १ मधून
अमोल आनंदा कांबळे
प्रशांत नामदेव इंगळे
सुवर्णा धर्मा खोत
प्रभाग क्रमांक २ मधून
अमोल शिवाजी धनवडे
बेबीताई केरबा कांबळे
अर्चना तानाजी कुंभार
तर प्रभाग क्रमांक ३ मधून
युवराज वसंत पाटील
मीना प्रवीण पोतदार व
रंजना सुनील शिंदे
यांची सदस्य पदी निवड झाली आहे
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजय उमेदवारांची नावे घोषित करताच समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी केली
SP 9 साठी बाजार भोगाव हुन सुदर्शन पाटील