मराठा आरक्षण उपसमितीची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बैठक होणार 

0
131

मराठा आरक्षण उपसमितीची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बैठक होणार असून या बैठकीला मनोज जरांगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार आहेत.

मला शंभुराज देसाईंचे पत्र आले. शासकीय बैठकीला मी काय करणार म्हणून मी सहभागी होणार नव्हतो. परंतु त्यांनी तुमचे म्हणणं बैठकीत मांडा असं सांगितले.

गेल्या ६ महिन्यांपासून आम्ही विषय मांडले आहेत. आम्ही ४ शब्द दिलेत, त्यातले २ शब्द जोडा. ५४ लाख नोंदी सापडलेत. ही बैठक लाईव्ह करणार का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी चार भिंतीच्या आत जात नाही. मी समाजासोबत आहे. आम्ही आमचे लढून मिळवू. आज नेमकं काय विषयावर बैठक आहे हे कळेल.

मी अंतरवाली सराटी इथं आहेत. समाज माझ्यासोबत आहे. जिल्हाधिकारी इथं येतील इथून VC च्या माध्यमातून बैठक होईल. मात्र आमची लढाई कायम आहे.

२० जानेवारीला मुंबईला जाण्याची तयारी आम्ही केली आहे. आम्ही सरकारला ६ महिन्याचा वेळ दिलाय. आता आम्ही ऐकणार नाही. हक्काचे आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच बैठकीत काय विषय येतायेत हे ऐकू द्या. सरकारची भूमिका काय ते बघू. कायदा पारित केला तरच मुंबईत न जाण्याचा विचार आम्ही करू. थोडे दिवस थांबू.

मी १० तारखेला सर्व सांगेन. २० जानेवारीला मुंबईत जाण्याचा मार्ग, टप्पे उघड करू आणि बरेच काही उघड करू. २० तारखेबाबत काहीही संभ्रम नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध झाले आहे. मराठवाड्यात नोंदी कमी आहेत. अधिकारी हलगर्जीपणामुळे देत नाही. मराठवाड्यात खूप नोंदी सापडतील असं सरकारला सांगितले आहे असं जरांगेंनी म्हटलं.

दरम्यान, या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमु्ख्यमंत्री हजर राहतील अशी माहिती आहे. मुंबईत मराठा आरक्षणाच्या ४ मॅरेथॉन बैठका असल्याचे कळवले आहे. त्यात प्रमुख अधिकारी, मंत्री उपस्थित असतील.

आज पूर्ण दिवस मराठा आरक्षणाबाबत बैठक आहे असं कळवलं आहे. बैठकीला मी यावे असं त्यांनी सांगितले. समाजाच्या वतीने मला उपस्थित राहावे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

चार भिंतीच्या आत चर्चा आहे. जर चर्चा लाईव्ह असती तर मी गेलो असतो. २० तारीख मुंबईत जाण्याची फायनल आहे. जी चर्चा आहे ती खुली असावी असं माझे मत आहे.

व्यासपीठावरून मी अंतरवालीतून समाजासमोर ही चर्चा करणार आहे. सरकारची भूमिका आज समाजाच्या लक्षात आहे. सरकार सकारात्मक आहे परंतु आरक्षण देत नाही असं जरांगे यांनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here