सदर पक्षी गणने मध्ये 92 प्रजातींच्या 855 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यामधील 18 स्थलांतरित प्रजाती, 2 स्थानिक स्थलांतरित, 72 रहिवासी प्रजातींची नोंद करण्यात आली.
पक्षी गणनेमध्ये बर्डस ऑफ कोल्हापूरचे प्रणव देसाई यांनी मार्गदर्शन केले तर अभिषेक शिर्के, पृथ्वीराज सरनोबत, मंदार रुकडीकर व ऋतुजा पाटील यांनी पक्षी गणनेच्या नोंदी केल्या.
बर्डस ऑफ कोल्हापूर च्या सर्वेक्षणातील पक्ष्यांवरील परिणामांची नोंद अशी, तलावाच्या शेजारी असलेल्या गवताळ भागात केलेल्या पदपथामुळे, येथे असणाऱ्या स्थलांतरित धोबी प्रजाती, तिरचिमणी, भारीट पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम दिसत आहे.
कोल्हापूर पक्षी गणानेच्या सातवा भाग रविवार 7 जानेवारी रोजी शिवाजी विद्यापीठ येथे होणार असून अधिक माहितीसाठी सोशल मिडियावरून ‘बर्डस ऑफ कोल्हापूर’ ला संपर्क करू शकता.
स्थलांतरित पक्षी : बुटेड इगल (सुतुंग), कॉमन ग्रीनशँक (हिरव्या पायाचा टीलवा), वूड सांडपायपर (कवड्या तुतारी), कॉमन सांडपायपर (सामान्य तुतारी), बार्न स्वालो (माळ भिंगरी), ब्राउन श्राइक (तपकीरी खाटीक), एशी ड्रोंगो (राखी कोतवाल), रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर (लाल छातीचा माशीमार), टायगा फ्लायकॅचर (लाल कंठाची माशीमार), क्लॅमरस रीड वॉब्लर (दंगेखोर बोरु वटवट्या), ब्लिथस रीड वॉब्लर (ब्लिथचा वेळू वटवट्या), बुटेड वॉब्लर (पायमोज वटवट्या), सायबेरीयन स्टोनचॅट (सायबेरीयाचा गप्पीदास), ब्लिथस् पीपीट (ब्लिथची तिरचिमणी), वेस्टर्न यल्लोव वॅगटेल (पिवळा धोबी), सिट्रीन वॅगटेल (पिवळ्या डोक्याचा धोबी), ग्रे वॅगटेल (करडा धोबी), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी)
IUCN संकटग्रस्त यादीतील प्रजाती : इंडियन रिव्हर टर्न (नदी सुरय), ब्लॅक हेडेड इबिस (पांढऱ्या डोक्याचा शराटी)