वडील करायचे फळ विक्री; मुलाने उभी केली 400 करोडो रुपयांची कंपनी; जाणून रघुनंदन यांचा प्रेरणादायी प्रवास

0
85

 मेहनत आणि यशाच्या जोरावर रघुनंदन श्रीनिवास कामथ यांनी मोठे यश संपादन केले. कर्नाटकातील एका छोट्याशा गावातील फळ विक्रेत्याच्या मुलाने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि ते घरापासून दूर मुंबईत स्वप्नांच्या शहरात गेले.

भीती आणि संकोचातून सुरू झालेला त्यांचा आईस्क्रीम बनवण्याचा व्यवसाय आज 400 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे. आज आपण नेचुरल्‍स आईस्क्रीमचे मालक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांच्या जीवनप्रवास जाणून घेणार आहोत.

रघुनंदन यांचे वडील करायचे फळ विक्री

रघुनंदन श्रीनिवास कामत यांचे वडील कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यातील एका गावात आंबे विकायचे. फळांची योग्य निवड करणे आणि त्यांचे जतन करणे त्यांनी वडिलांकडून शिकले होते. अनेक वर्षे वडिलांसोबत राहिल्यानंतर त्यांनी फळे निवडणे आणि जतन करणे शिकले, त्यानंतर व्यवसाय करण्याच्या उद्देशाने ते मुंबईत आले. रघुनंदन यांनी 14 फेब्रुवारी 1984 रोजी त्यांचा पहिला आईस्क्रीम ब्रँड Naturals सुरू केला आणि जुहू, मुंबई येथे पहिले स्टोअर उघडले. त्यावेळी त्यांच्या कंपनीत फक्त 4 कर्मचारी होते आणि त्यांनी 10 फ्लेवर्सच्या आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला.

कामत यांना सुरुवातीला आईस्क्रीमची चव लोकांना आवडेल की नाही याची भीती वाटत होती. या भीतीमुळे सुरुवातीला मुख्य उत्पादन म्हणून आईस्क्रीम विकण्याऐवजी त्यांनी पावभाजी विकण्यास सुरुवात केली आणि अॅड-ऑन म्हणून आईस्क्रीम देऊ केले. नंतर त्यांनी 12 प्रकारच्या फ्लेवर्ससह आईस्क्रीम पार्लर म्हणून स्टोअर सुरू केले.

कामत यांनी जवळपास 4 दशकांपासून आपल्या आईस्क्रीमची खासियत राखली आहे. कामतचे आईस्क्रीम पूर्णपणे नैसर्गिक उत्पादनांवर अवलंबून असते. KPMG ने आपल्या सर्वेक्षणात म्हटले होते की, नॅचरल्सचा देशातील टॉप 10 ब्रँडमध्ये समावेश आहे, ज्याचे ग्राहक अनुभवाच्या दृष्टीने मूल्यांकन करण्यात आले होते. आर्थिक वर्ष 2020 मध्ये, नॅचरल्सने सुमारे 300 कोटी रुपयांची उलाढाल साधली, जी 2022 मध्ये वाढून 400 कोटी रुपये झाली.

रघुनंदनचा नॅचरल्स ब्रँड आज त्यांची पत्नी अन्नपूर्णा आणि मुले सिद्धांत आणि श्रीनिवास आणि सुमारे 125 कर्मचारी यांच्यासोबत दररोज 20 टन आईस्क्रीम तयार करतो. एकेकाळी, त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न महिन्याला 100 रुपयांपेक्षा कमी होते. मात्र वयाच्या 37 व्या वर्षी व्यवसाय सुरू करण्याचे धाडस दाखविणाऱ्या कामत यांनी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर व्यवसायात हात आजमावण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या जिद्दीने तो यशस्वी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here