‘या’ माशाची किंमत ऐकून व्हाल थक्क, इतक्या रुपयांमध्ये होईल परदेश ट्रिप, अनेक गोष्टींसाठी होतो वापर

0
92
'या' माशाची किंमत ऐकून व्हाल थक्क, इतक्या रुपयांमध्ये होईल परदेश ट्रिप, अनेक गोष्टींसाठी होतो वापर

23 जानेवारी 2024 : फक्त परदेशात नाही तर, भारतात देखील मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. भारतातील असंख्य नागरिकांना वेग-वेगळ्या प्रकारचे मासे खायला आवडतात. लग्न असो किंवा इतर कोणतीही पार्टी किंवा फंक्शनमध्ये लोक मासे खायला विसरत नाहीत.

भारतात अनेक फिश मार्केट आहेत. जेथे अनेक प्रकारचे मासे मिळतात. पण आज अशा एक माशाबद्दल जाणून घेऊ ज्याची किंमत जाणून तुम्ही हैराण व्हाल… सध्या ज्या महागड्या माशाची चर्चा रंगली आहे, त्या माशाच्या किंमतीत तुम्ह परदेश ट्रिप करुन याल..

सांगायचं झालं तर, सध्या ज्या माशाची चर्चा रंगली आहे… तो मासा दुसरा तिसरा कोणता नसून घोळ मासा. घोळ मासा प्रामुख्याने गुजरात याठिकाणी आठळतो. घोळ माशाला गुजरातचा राज्य मासाही घोषित करण्यात आलं आहे. भारतातील अनेक मोठ्या माशांमध्ये घोळ माशाच्या देखील समावेश होतो.

घोळ मासा फक्त गुजरात मध्येच नाही तर, महाराष्ट्राच्या समुद्रात आढळतो. घोळ माशाचा रंग सोनेरी आणि तपकिरी आहे. या माशाची मागणी खाण्यासाठी कमी पण इतर कारणांमुळे जास्त असते. घोळ माशाचा उपयोग अनेक गोष्टी तयार करण्यासाठी केला जातो.

बियर तयार करण्यासाठी होतो घोळ माशाचा वापर

मिळालेल्या माहितीनुसार, घोळ माशापासून बियर आणि वाईन तयार केली जाते. घोळ माशापासून तयार करण्यात आलेल्या बियर आणि वाईनची किंमत फार असते. महत्वाची गोष्ट म्हणजे घोळ माशाचं मांस आणि एयर ब्लॅडर पासून बियर तयार केली जाते.

एवढंच नाही तर, एयर ब्लॅडरचा उपयोग औषधी उत्पादनात देखील केला जातो. घोळ माशाचे एअर ब्लॅडर्स मुंबईतून इतर देशांतही निर्यात केले जातात. घोळ माशाची लांबी सुमारे दीड मीटर असते. घोळ माशाची मागणी देखील जास्त असते.

घोळ माशाची मागणी जास्त असल्याने माशाचे दरही खूप जास्त आहेत. गुजरातमध्ये एका घोल माशाची किंमत 5 लाख रुपयांपर्यंत आहे… असं देखील सांगितलं जातं. एवढ्या पैशात तुम्ही एक परदेश ट्रिप तर नक्की करु शकता… घोळ मासा ज्या मच्छीमाराच्या जाळ्यात सापडला त्याचं नशीबच फळफळचं असं देखील सांगितलं जातं. असे अनेक मासे आहे, जे प्रचंड महाग असतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here