मेष( २१ ते २७ जानेवारी २०२४ )
मेष : व्यवहार जपून करा
दिनांक ३०, ३१ हे दोन संपूर्ण दिवस १ तारखेला दुपापर्यंत अशा या कालावधीत कितीही शांत राहायचे ठरवले तरीही तसे होणार नाही. तुमची चिडचिड ही वाढणारच. त्यामुळे सुरळीत बसलेली घडी विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे विचार करूनच काम करावे लागेल, हे लक्षात ठेवा. एखादी गोष्ट नाही पटली तर ती सोडून द्या. त्यावर फारसा विचार करू नका. या दिवसांत अनोळख्या व्यक्तीशी बोलताना जवळीकता वाढवू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले तरी खर्चही तेवढाच असेल. नोकरदार वर्गाला कामाचा ताण जाणवेल. आर्थिक व्यवहार जपून करा. संततीबाबतीत निर्णय घ्यायला उशीर करू नका. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. शारीरिकदृष्टय़ा योगसाधनेला महत्त्व द्या.
शुभ दिनांक : २८, २९
महिलांसाठी : शांतपणे मत मांडा.
२१ ते २७ जानेवारी २०२४ )
वृषभ : योग्य समन्वय साधा
१ तारखेला दुपारनंतर दिनांक २ व ३ हे संपूर्ण दोन दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी चांगला कसा घालवता येईल ते पाहा. म्हणजेच या दिवसात कारण नसताना कोणाच्या तोंडाशी लागू नका. त्यामुळे वादविवाद होऊ शकतात. स्पष्ट बोलणे टाळा. कोणी काय बदल करावे यापेक्षा स्वत: काय बदल करायचे ते पाहा. म्हणजे तुम्हाला स्वत:लाच त्रास होणार नाही. योग्य समन्वय साधा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यावसायिकदृष्टय़ा नफा चांगला मिळेल. नोकरदार वर्गाच्या कामकाजासाठी वेळ जास्ती द्यावा लागेल. आर्थिक बाबतीत नियोजन करा. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य फारसे मिळणार नाही. मित्र-मैत्रिणीकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. घरगुती वातावरण ठीक राहील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ दिनांक : ३०, ३१
महिलांसाठी : विचार करून बोला.
मिथुन( २१ ते २७ जानेवारी २०२४ )
मिथुन : ताणतणाव कमी होईल
सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी चांगला आहे. त्यामुळे कोणत्याही कामाला अडथळा येणार नाही. दरवेळी तुमच्या मनाची चलबिचल अवस्था होते सध्या ती होणार नाही. तुमची भूमिका ठाम राहील. ठरवून ठेवलेल्या गोष्टीत बदल होणार नाही. आजचे काम उद्यावर ढकलण्याची वेळ येणार नाही. अगदी वेळेत काम पूर्ण होईल. त्यासाठी इतरांची मदतही मिळेल. व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत होतील. नोकरदार वर्गाला कोणतेही काम करताना वरिष्ठांचा प्रतिसाद मिळेल. आर्थिक गोष्टी मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली तरी सध्या उत्साह वाटणार नाही .मित्र-मैत्रिणींशी मनमोकळे बोलल्याने हलके वाटेल. संतती सौख्य लाभेल. घरगुती वातावरण चांगले राहील.मानसिक ताणतणाव कमी होईल. आरोग्य चांगले राहील.
शुभ दिनांक : २, ३
महिलांसाठी : हातून पुण्य कर्म घडेल.
कर्क( २१ ते २७ जानेवारी २०२४ )
कर्क : यश मिळेल
शुभ ग्रहांची साथ उत्तम राहील. कोणत्याच दिवसाची काळजी करण्याची चिंता वाटणार नाही. कारण सर्वच दिवस चांगले असतील. चांगल्या कालावधीमध्ये फारसा संघर्ष करावा लागत नाही याचा अनुभव तर तुम्ही घेतलाच असेल. संघर्ष कमी झाल्यामुळे कामातील उत्साहही वाढेल . कोणतेही निर्णय घेताना द्विधावस्था होणार नाही. घेतलेले निर्णय योग्य असतील. कोणी आपले काम करावे ही मानसिकताच राहणार नाही . व्यवसायिकदृष्टय़ा यश मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन प्रस्ताव फायदेशीर असतील. आर्थिकदृष्टय़ा परिस्थिती समाधानाची असेल. राजकीय क्षेत्रात अधिकार पद मिळेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. धार्मिक गोष्टींसाठी वेळ देता नाही आला तरी खर्च कराल. आरोग्य ठणठणीत राहील.
शुभ दिनांक : २९, ३०
महिलांसाठी : मनासारख्या गोष्टी घडतील.
सिंह( २१ ते २७ जानेवारी २०२४ )
सिंह : वैवाहिक जीवन सुखाचे
या आठवडय़ात सर्व दिवसांचा कालावधी चांगला जाणार आहे. मागील काही दिवस ताणतणावाचे गेले तरी सध्याचे दिवस सुगीचे आहेत. असे म्हणायला हरकत नाही. संधी केव्हा मिळेल याची वाट बघत बसू नका. हे दिवस संधीचे आहेत. सध्या निवांत वेळ घालवून चालणार नाही. चांगल्या कालावधीमध्ये बरेच काही चांगले होते हे विसरू नका. त्यामुळे कामाचे नियोजन मात्र जोरदार करा. ते यशस्वी होईल. त्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. व्यवसायात अनेक मार्गातून प्रस्ताव येतील. नोकरदार वर्गाचा कामातील उत्साह वाढेल. आर्थिक प्रश्न मिटेल. राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा पूर्ण होईल. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील शेजाऱ्यांविषयी आपुलकी वाटेल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील . आरोग्याची काळजी मिटेल.
शुभ दिनांक : २८, २९
महिलांसाठी : अनेक क्षेत्रांत सरस राहाल.
कन्या( २१ ते २७ जानेवारी २०२४ )
कन्या : गुंतवणूक टाळा
२७ तारखेला दुपारनंतर दिनांक २८ व २९ हे संपूर्ण दोन दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी अनुकूल नसेल. अशा वेळी समोरून आलेला प्रस्ताव हा फसवणुकीचा असेल . अशा प्रस्तावाला बळी पडू नका. इतरांनी आपले मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. तेव्हा निर्णय घ्यायला घाई करू नका. चांगल्या कामासाठी उशीर लागला तरी चालेल. हे मात्र विसरू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात आतापर्यंतचे जे जुने व्यवहार डोके वर काढत होते ते पुन्हा एकदा डोके वर काढू शकतात. नोकरदार वर्गाला क्षुल्लक कारणावरून मनस्ताप होऊ शकतो. हा मनस्ताप करून घेऊ नका. आर्थिकदृष्टय़ा गुंतवणूक टाळा. कुटुंबाची साथ मिळेल. जोडीदाराचा सल्ला नाही पटला तरी पटवून घ्या. प्रकृती जपा.
शुभ दिनांक : ३०, ३१
महिलांसाठी : योग्य समतोल साधा.
तूळ( २१ ते २७ जानेवारी २०२४ )
तूळ : चंचल वृत्ती राहील
दिनांक ३०, ३१ हे संपूर्ण दोन दिवस व १ तारखेला दुपापर्यंत अशा या दिवसात चंचल वृत्ती राहील. हे दिवस चढउताराचे राहणार आहेत. हे माहीत असतानासुद्धा विचार करून वेळ वाया घालवणे व मानसिकता बिघडवून घेणे योग्य राहणार नाही. ज्या गोष्टींची गरज आहे अशाच गोष्टींसाठी प्रयत्न करा. प्रयत्नांना लगेचच यश मिळेल असे नाही. त्यासाठी धीर धरा . कोणाची अपेक्षा ठेवून नका. आपले काम आपणच करायचे आहे हे लक्षात ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यावसायिकदृष्टय़ा आगामी काळासाठी जी गुंतवणूक करणार आहे ती विचारपूर्वक करा. नोकरदार वर्गाला कामाच्या वेळापत्रकानुसार काम करावे लागेल. खर्च सांभाळण्याचा प्रयत्न करा. मित्र-मैत्रिणींची मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले ठेवा. जोडीदाराची साथ मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : २८, २९
महिलांसाठी : इतरांना सल्ला देणे टाळा.
वृश्चिक( २१ ते २७ जानेवारी २०२४ )
वृश्चिक : मोह आवरा
१ तारखेला दुपारनंतर दिनांक २ व ३ या संपूर्ण दिवसात सावकाश पाऊल टाकावे लागेल. म्हणजेच या दिवसात एक घाव दोन तुकडे करून चालणार नाही. कोणत्याही गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा असेल तर त्यासाठी संयम ठेवावा लागेल. जी गोष्ट तुम्हाला समोरच्याला बोलून दाखवायची आहे त्यासाठी तुमच्याकडे संयम वृत्ती राहत नाही. अशावेळी नुकसान होते . तेव्हा हा स्पष्ट बोलण्याचा मोह आवरा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षासुद्धा चांगला लाभ होईल. नोकरदार वर्गाला जास्ती कामाचे नियोजन करावे लागेल. समाजसेवा करताना भान ठेवा . मित्र-मैत्रिणींशी जेवढय़ास तेवढे राहा. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. मानसिकता जपा . शारीरिकदृष्टय़ा योग साधनेला महत्त्व द्या.
शुभ दिनांक : ३०, ३१
महिलांसाठी : कोणत्याही नात्यात गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या.
धनु( २१ ते २७ जानेवारी २०२४ )
धनू : सप्ताह भाग्योदयाचा
भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे असे भ्रमण बरेच दिवसांतून आलेले आहे. प्रत्येक वेळी वादविवाद होतात म्हणून शांत राहणे हा पर्याय तुम्ही शोधत होता .पण सध्या तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा असणार आहे. म्हणजेच समोरच्याकडून गोड बोलून काम करून घेणे हे सूत्र तुम्हाला चांगले जमणार आहे. सध्या कोणत्याही कामासाठी अडथळा नसल्यामुळे कामाचा कंटाळा येणार नाही. व्यवसायात आतापर्यंत जी वसुली होत नव्हती ती वसुली अनपेक्षितपणे होणार आहे. नोकरदार वर्गाला कामांमध्ये जी नेहमी टांगती तलवार राहायची ती आता राहणार नाही. आर्थिक लाभ होईल. समाजसेवा करताना काळवेळेचे भान राहणार नाही . मैत्रीचे नाते अतूट होईल. मुलांची प्रगती होईल. एकूणच सप्ताह भाग्योदयाचा असेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ दिनांक : २८, २
महिलांसाठी : कष्टाचे फळ चांगले मिळेल.
मकर( २१ ते २७ जानेवारी २०२४ )
मकर : द्विधावस्था होईल
२७ तारखेला दुपारनंतर दिनांक २८ व २९ हे संपूर्ण दोन दिवस चांगले आहेत. असे म्हणता येणार नाही. कारण या दिवसात तुम्ही जे ठरवता त्याच्या विरोधीच होते. काहीवेळा गोष्टी अंगलट येतात. त्यामुळे तुमचीच द्विधावस्था होईल की काय करावे आणि काय करू नये. पण स्वत:च्या हाट्टापायी घेतलेला निर्णय नुकसानीचा ठरू शकतो. त्यामुळे निर्णय घेताना मागील अनुभव विसरू नका. अशावेळी आपणच बदल स्वीकारणे योग्य राहील. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात गुंतवणूक करावी लागेल. नोकरदार वर्गाला अधिकारपद मिळेल.नातेवाईकांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. भावंडांशी संवाद जपून करा. शेजाऱ्यांशी अलिप्त राहा. धार्मिक गोष्टीत उत्साह वाटणार नाही. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
शुभ दिनांक : ३०, ३१
महिलांसाठी : जबाबदारी विसरून चालणार नाही.
कुंभ( २१ ते २७ जानेवारी २०२४ )
कुंभ : आहारावर नियंत्रण ठेवा
दिनांक ३०, ३१ हे संपूर्ण दोन दिवस व १ तारखेला दुपापर्यंत अशा या दिवसात कोणाशीही संवाद करताना तो जपूनच करा. तुमचा हेतू चांगला असला तरी समोरच्याला पटणारा नसेल. अशावेळी वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. तेव्हा तोंडावर ताबा ठेवलेला चांगला . हे लक्षात ठेवा. इतरांनी काय करावे आणि काय करू नये या गोष्टीत पडू नका. एखादे काम वेळेत झाले नाही म्हणून चिडचिड करू नका. त्यामुळे तुम्हाला स्वत:ला त्रास होऊ शकतो. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातून बऱ्यापैकी उत्पन्न वाढेल. नोकरदार वर्गाला कामाचा अंदाज येणार नाही. आर्थिकदृष्टय़ा प्रगती होईल. समाजसेवा करताना नकळत आपल्याकडून कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. जोडीदाराचा आदर कराल. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. आहारावर नियंत्रण ठेवा.
शुभ दिनांक : २, ३
महिलांसाठी : समजुतीने निर्णय घ्या.
मीन( २१ ते २७ जानेवारी २०२४ )
मीन : प्रकृती जपा
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. या कालावधीत सतर्कता बाळगावी लागेल. सहनशीलता वाढवा. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे ही सवय सोडून द्या. कारण सध्या काही गोष्टी आंगलट येऊ शकतात. समोरच्याचे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. नाही पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. त्यावर तुमचे मत तयार करू नका. त्यामुळे परिस्थिती बिघडू शकते . सध्याचे दिवस फारसे चांगले नाहीत. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत सहभाग टाळा. त्यामुळे त्रास होणार नाही. व्यवसायातील बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष दिल्यास नुकसान होणार नाही. नोकरदार वर्गाला कामाचे नियोजन म्हणावे असे जमणार नाही. आर्थिक बाबतीत उधारीचे व्यवहार टाळा. कुटुंबाची काळजी घ्या. जोडीदाराचा सल्ला घ्या. मानसिक समतोलता राखा. प्रकृती जपा.
शुभ दिनांक : ३०, ३१
महिलांसाठी : मिळतेजुळते घ्या.