सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहणं टाळा! नाहीतर ‘या’ आजारांना बळी पडाल

0
61

आता मोबाइल हा आपल्या जीवनातला महत्त्वाचा घटक बनला आहे. अलीकडच्या काळात मोबाइल वापराचं प्रमाण खूप वाढलं आहे. काही जणांना तर मोबाइलचं अक्षरशः व्यसन जडलं आहे. अनेक जण सातत्याने मोबाइलवर स्क्रोलिंग करताना आपण पाहतो.

सातत्याने मोबाइल वापरणं आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. काही जण तर सकाळी झोपून उठल्यावर लगेच हातात मोबाइल घेऊन स्क्रोलिंग सुरू करतात. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मोबाइलचा वापर हानिकारक ठरू शकतो.

अलीकडे लोकांचा बहुतांश वेळ मोबाइल वापरण्यात जातो. आता सर्व वयोगटातल्या व्यक्ती मोबाइलचा वापर करू लागल्या आहेत. शाळा-कॉलेज किंवा ऑफिस काम असो अथवा मनोरंजनाची गरज असो लोकांच्या हातात सातत्यानं मोबाइल पाहायला मिळतो. अनेक जण सकाळपासून रात्रीपर्यंत मोबाइलच्या स्क्रीनवर स्क्रोलिंग करताना दिसतात; पण मोबाइल फोनचा अतिवापर हानिकारक ठरू शकतो. काही जण सकाळी झोपेतून उठल्याबरोबर पहिला मोबाइल चेक करतात; पण ही सवय देखील आजाराची जोखीम वाढवणारी आहे.

तज्ज्ञांच्या मते, मोबाइल फोनमधून बाहेर पडणारी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फिल्ड अर्थात ईएमएफएस पचनशक्तीवर प्रतिकूल परिणाम करू शकते. यामुळे डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. दिवसभर पचन आणि ऊर्जेशी संबंधित समस्या जाणवू शकतात.

सकाळच्या वेळी तीव्र ब्राइटनेस असलेला मोबाइलचा स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवरचा ताण वाढतो. यामुळे अस्वस्थ वाटणं, डोकेदुखी आणि डोळ्यांना सूज येणं अशा समस्या उद्भवू शकतात. तसंच सकाळी उठल्यावर लगेच मोबाइल पाहण्याची सवय डोळ्यांच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.

तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच मोबाइल वापरायची सवय असेल तर त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे तीव्र डोकेदुखी आणि पचनक्रिया बिघडण्याची समस्या जाणवते. तसंच यामुळे तणावदेखील वाढू शकतो.सकाळी वेगवेगळ्या प्रकारची माहिती वाचनात आल्याने अस्थिरता आणि तणाव वाढतो. काम, सोशल मीडिया आणि बातम्यांच्या सातत्याने येणाऱ्या अपडेट्समुळे मानसिक दबाव वाढतो. त्यामुळे दिवस तणावात जाऊ शकतो.

सकाळी उठल्यावर लगेच मोबाइल तपासण्याच्या सवयीमुळे कॉग्निटिव्ह फंक्शन अर्थात संज्ञानात्मक कार्यप्रणालीत व्यत्यय येऊ शकतो. सकाळी खूप जास्त नोटिफिकेशन्स तपासल्याने अलर्ट राहण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे साहजिकच मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here