चित्रपट निर्माता बोनी कपूर यांच्या चित्रपटांसोबतच त्यांचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत असतं. 

0
110

oney Kapoor Sridevi’s Secret Marriage : चित्रपट निर्माता बोनी कपूर यांच्या चित्रपटांसोबतच त्यांचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत असतं. त्यात त्यांचं वैवाहिक आयुष्य तर नेहमीच चर्चेत असायचं.

आज बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर यांचा स्मृतीदिन आहे. या सगळ्यात बोनी कपूर यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होते. या मुलाखतीत त्यांनी श्रीदेवी यांच्याशी गुपचुप लग्न आणि लेक जान्हवीच्या जन्मावर वक्तव्य केलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, अशा चर्चा असायच्या की श्रीदेवी आणि बोनी कपूर हे लग्न करण्याआधीच त्या प्रेग्नंट होत्या. तर लग्नाच्या दोन महिन्यात जान्हवी कपूरचा जन्म झाला. त्यासगळ्या गोष्टींवर बोनी कपूर यांनी वक्तव्य केलं होतं.

बोनी कपूर यांनी ही मुलाखत ‘द न्यू इंडियन’ ला दिली होती. यावेळी खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा त्यांनी खुलासा केला. बोनी कपूर यांनी हे देखील सांगितलं की त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच मोना यांना धोका दिला नाही.

त्यांच्यासोबत ते प्रामाणिकच होते. बोनी कपूर म्हणाले की जेव्हा त्यांना श्रीदेवी यांच्यावर प्रेम झाले तेव्हा ते विवाहित होते आणि मोना यांच्यासोबत होते. बोनी कपूर यांच्या म्हणण्यानुसार, मोना यांना ते प्रामाणिक होते.

त्यांच्या हृदयात श्रीदेवी यांच्यासाठी भावना होत्या, त्याविषयी पत्नी मोना यांना त्यांनी स्वत: सांगितले होते. बोनी कपूर यांनी सांगितलं की त्यांनी श्रीदेवी यांच्याशी गुपचुप लग्न केलं होतं. मात्र, त्यांच्या लग्नाविषयी तेव्हा घोषणा केली जेव्हा त्या प्रेग्नंट होत्या.

बोनी कपूर यांनी सांगितलं की त्यांनी श्रीदेवी यांच्यासोबत 2 जून रोजी शिर्डीत लग्न केलं. तेव्हाच आम्ही एकमेकांना वचनं दिली. आम्ही तिथेच होतो, तिथेच आम्ही रात्री थांबलो आणि जानेवारी 1997 मध्ये जेव्हा त्यांच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आली तेव्हा आमच्याकडे सगळ्यांसमोर लग्न करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. आम्ही सगळ्यांसमोर जानेवारी1997 मध्ये लग्न केलं. मात्र, आजही काही लेखक आहेत, जे लिहितात की श्रीदेवी लग्नाच्या आधी प्रेग्नंट होत्या.

बोनी कपूर यांनी 1983 मध्ये मोना यांचीशी लग्न केलं होतं. मात्र, 1996 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली असून अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर अशी त्यांची नावं आहेत. तर 2012 मध्ये मोना यांचे निधन झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here