इंग्लंडमधील एका लिलावाची सध्या चर्चा आहे. या लिलावात एका कपाटात ठेवलेले 285 वर्षांपूर्वीचे लिंबू चक्क दीड लाख रुपयांत विकले गेले आहे. ब्रेटेल्समध्ये झालेल्या लिलावात असे सांगण्यात आले की, एका व्यक्तीला आपल्या काकाच्या घरात असलेल्या 19व्या शतकातील कपाटात हे लिंबू सापडले.
कपाटाचा लिलाव करणारा कपाटाचे पह्टो काढत असताना त्याची नजर लिंबावर गेली. लिंबू काळे पडले होते. त्यावर एक मेसेज लिहिला होता. त्यात लिंबू कुणी कुणाला दिले त्यांची नावे आणि 4 नोव्हेंबर 1739 साल होते. असं मानलं जातंय की, हिंदुस्थानातून इंग्लंडला एक रोमँटिक गिफ्ट म्हणून ते पाठवण्यात आले होते. लिंबाचा लिलाव सुरू झाला तेव्हा त्याला दीड लाख रुपयांची बोली लागली.