जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेला पाच सिल्वर सह,एक ब्राँझ मेडल आणि वैयक्तिक चॅम्पियनशिप.

0
23

प्रतिनिधी रोहित डवरी

गोवा वास्को येथे पार पडलेल्या जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडे याने 50/100 मीटर बटरफ्लाय सिल्वर मेडल.50 मीटर फ्रीस्टाईल मध्ये ब्राँझ मेडल,100 मीटर फ्रीस्टाईल सिल्वर मेडल.50 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सिल्वर मेडल.200 मीटर IM सिल्वर मेडल सह वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळाली. त्याला मडगांवचे आमदार श्री संकल्प आमोणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र,मेडल,ट्रॉफी, रोख रक्कम तसेच पंचतारांकित हॉटेल मध्ये एक रात्र राहण्यास देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


भगतसिंग यांने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके मिळवली आहेत. सध्या तो बेळगाव येथील केएलई स्विमिंग क्लब मध्ये प्रशिक्षण घेत आहे. या कामी त्याला अजिंक्य मेंडके,
अजित जेंटीकट्टी,राजेश शिंदे,अतुल धुडूम , इम्रान सर ,गोर्धन सर,सतीश यादव यांचे मार्गदर्शन तर, केएलई इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल कुवेंपूनगर बेळगावस्टाफ यांचे सहकार्य लाभले.
रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर, प्रभाकर कोरे(अध्यक्ष केएलई सोसायटी) आणि उमेश कलघटगी* यांनी पाठिंबा व प्रोत्साहन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here