
*गुरुकुलच्या यशस्वी विद्यार्थ्यांची इस्त्रोला भेट.–गुरुकुल प्रज्ञाशोध परिक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थीचा समावेश
प्रतिनिधी आशिष कोठावळे
गुरुकुल प्रज्ञाशोध परिक्षेमध्ये उज्वल यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना इस्त्रो अभ्यास सहलीचे आयोजन गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किरण चौगुले यांनी केले होते.राज्यातील 25 जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय गुरुकुल मराठी , सेमी,उर्दु या माध्यमांतून घेतलेल्या परिक्षांचा निकाल लागला.राज्यातील 60 गुणवत्ताधारक विद्यार्थांना रोख पारितोषिक देण्याऐवजी संस्थेने इस्त्रोची सफर,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र जाहीर केले.त्यानुसार नुकतीच 60 विद्यार्थीची इस्त्रो (बेंगलोर) व म्हैसूर या प्रेक्षणीय स्थळांची शैक्षणिक सहल घडवून आणली.विद्यार्थांनी इस्त्रो येथील विविध विभागांना भेटी देऊन विज्ञान व अंतराळ संशोधन क्षेत्रातील कार्य पद्धतीची माहिती घेतली.तेथील अनेक वैज्ञानिकांशी संवाद साधला.तसेच प्रेक्षणीय निसर्ग सौंदर्याने नटलेल्या म्हैसूर शहरातील प्रसिद्ध राजवाडा , वृद्धांवन गडिन , प्राणीसंग्रालय अशा विविध ठिकाणी भेटी दिल्या. तेथील पार्श्वभूमिची माहिती घेतली. त्यामुळे इस्त्रो व म्हैसूर येथील शैक्षणिक सफरीचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या निश्चितच फायदा झाला.यापुढे विद्यार्थाच्या हिताचे असे विविध उपक्रम राबविण्यात येणारे असल्याचे किरण चौगुले यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या व्यावस्थापक गौरी चौगुले, विनायक पोवार, आशिष कोठावळे ,क्षितीज चौगुले,संजय गावडे, तेज चौगले उपस्थित होते.