रणबीर कपूर बनला ‘पीएनजी ज्वेलर्स’चा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर पीएनजी ला मिळणार आता जगभर ओळख

0
10

प्रतिनिधी : प्रमोद पाटील

कोल्हापूर, २२ जानेवारी २०२६ : १८३२ पासूनचा समृद्ध वारसा जपणारा भारतातील एक अग्रगण्य दागिन्यांचा ब्रँड ‘पीएनजी ज्वेलर्स’ने बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर याची नवा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. परंपरेची जाण, आकर्षकता आणि विश्वासार्हता यांचा सहज संगम असलेला रणबीर कपूर ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या प्रवासातील एक रोमांचक नवा अध्याय ठरणार असून, यामुळे ब्रँडची राष्ट्रीय पातळीवरील उपस्थिती अधिक भक्कम करणार आहे.

“पीएनजी ज्वेलर्स हा पिढ्यान्‌पिढ्यांचा वारसा जपणारा आणि विश्वास व मूल्यांवर उभा असलेला ब्रँड आहे, ज्याचा मी मनापासून आदर करतो. परंपरेचा सन्मान करत भविष्याकडे आत्मविश्वासाने वाटचाल करणाऱ्या या ब्रँडचा भाग होणे माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि या प्रवासाचा मी अभिमानाने भाग बनत आहे.”या भागीदारीबद्दल आपला आनंद व्यक्त करताना ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले,“रणबीर कपूर यांचे व्यक्तिमत्त्व परंपरेचा आदर राखत आधुनिकतेकडे आत्मविश्वासाने वाटचाल करणारे आहे. जसा पीएनजी ज्वेलर्सने आपल्या मुळांशी निष्ठा राखत काळानुसार स्वतःला विकसित केले आहे, तसेच रणबीर कपूरने एका आयकॉनिक वारशाला प्रामाणिकपणे आणि सुसंगततेने पुढे नेले आहे. ही भागीदारी केवळ दृश्यमानतेपुरती मर्यादित नसून, समान मूल्ये आणि भविष्याकडे पाहणाऱ्या सामायिक दृष्टीकोनावर आधारित आहे.”या सहकार्याद्वारे पीएनजी ज्वेलर्स आपली ओळख विश्वासाचे प्रतीक, विकसित होत असलेला वारसा आणि कालातीत सौंदर्य म्हणून अधिक मजबूत करत असून, परंपरा आणि आधुनिक भारत यांच्यातील एक सशक्त नाते निर्माण करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here