शाश्वत जलजीव संवर्धनातून उद्योजकतेची नवी दारे खुली विवेकानंद महाविद्यालयात खेकडा व मोती संवर्धनावर शास्त्रीय कार्यशाळा

0
7

प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे

कोल्हापूर :खेकडा व मोती संवर्धन ही क्षेत्रे शाश्वत जलजीव संवर्धन, ब्लू इकॉनॉमी तसेच ग्रामीण व किनारपट्टी उद्योजकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, योग्य वैज्ञानिक प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे ज्ञान मिळाल्यास या क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक श्री. मयूर जगदाळे यांनी केले.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथील प्राणीशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने, शिवाजी विद्यापीठाच्या लीड कॉलेज योजनेअंतर्गत (न्यू कॉलेज, कोल्हापूर क्लस्टर)“भारतातील खेकडा व मोती संवर्धनातील आधुनिक कल व विपणन धोरणे” या विषयावर एकदिवसीय शास्त्रीय कार्यशाळा महाविद्यालयाच्या लायब्ररी हॉलमध्ये यशस्वीपणे पार पडली.कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री. जगदाळे यांनी खेकडा पालनातील आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञान, मोती संवर्धनातील उदयोन्मुख वैज्ञानिक पद्धती, मूल्यवर्धन प्रक्रिया तसेच विपणनातील संधी यावर संशोधनाधारित व सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा व संशोधकांचा या तांत्रिक सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यशाळेचे उद्घाटन मा. अध्यक्ष व प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकात डॉ. टी. सी. पाटील यांनी कार्यशाळेची वैज्ञानिक भूमिका, उद्दिष्टे तसेच लीड कॉलेज योजनेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट केले. यावेळी IQAC समन्वयक प्रा. श्रुती जोशी व लीड कॉलेज समन्वयक डॉ. व्ही. बी. वाघमारे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. थोरात यांनी कौशल्याधारित व उद्योगाभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून ब्लू इकॉनॉमी विकसित करण्यासाठी खेकडा व मोती संवर्धन क्षेत्रांचे आर्थिक व वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित केले. उद्घाटन सत्राचा समारोप डॉ. टी. सी. गौपाले यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.तांत्रिक सत्रांचा परिचय प्रा. गणेश एच. फडके यांनी करून दिला, तर आभारप्रदर्शन प्रा. एन. ए. जाधव यांनी केले. दुपारी झालेल्या समारोप कार्यक्रमात कार्यशाळेचा सविस्तर अहवाल प्रा. एन. ए. पटेल यांनी सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक व प्रात्यक्षिक अनुभवांचे मनोगत व्यक्त केले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही प्रा. पटेल यांनी केले.कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. के. सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here