कोतोली | प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे

कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार सौ. संगिता शंकर पाटील तसेच पंचायत समिती बाजार भोगावचे उमेदवार युवराज रंगराव चौगुले यांच्या प्रचारासाठी आज मतदारसंघात जोरदार जनसंपर्क दौरा पार पडला.या दौऱ्यात मानवाड, गुरववाडी, खापणेवाडी, भैरी धनगरवाडा, पोंबरे, चव्हाणवाडी, कांडरवाडी, दाबोलकरवाडी आदी गावांमध्ये ग्रामस्थांनी ठिकठिकाणी उमेदवारांचे फुलांनी, औक्षणाने व घोषणाबाजीने उत्साहात स्वागत केले.

अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी “आम्ही तुम्हाला विजयी करू” असा ठाम विश्वास व्यक्त केला.यावेळी बोलताना उमेदवारांनी जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विकासाभिमुख कार्याचा आढावा मांडला. आगामी काळात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला व युवकांसाठी ठोस विकासकामे प्राधान्याने मार्गी लावून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.या प्रचार दौऱ्यात दत्ता शिंदे, अमर सुतार, संभाजी बापू पाटील, फुलाजी पाटील, बाळासो पाटील (कोलिक), भिकाजी पाटील (काळजवडे), प्रशांत पाटील, एम. डी. पाटील, पांडुरंग गांजवे, युवराज पोवार, ओंकार पाटील, सानिकेत पाटील, महादेव सातपुते, उदय पाटील यांच्यासह जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकूणच या प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांचा वाढता विश्वास, युवकांचा उत्साह आणि महिलांचा सक्रिय सहभाग पाहता कोतोली मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाला भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.


