
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
बाजारभोगावं येथे शिंदे सेनेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा आज मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शुभारंभ झाला. मा. श्री. अजित नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रचार समारंभाने परिसरातील राजकीय वातावरण तापले असून महायुतीच्या उमेदवारांना मोठे बळ मिळाले आहे.कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातील शिंदे सेनेच्या उमेदवार वर्षाराणी अरुण पाटील, पंचायत समितीचे उमेदवार आण्णासाहेब बाळकू गायकवाड तसेच खोत यांच्या प्रचारार्थ बाजारभोगाव येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला. मा. अजित नरके यांच्या हस्ते प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.यावेळी बोलताना अजित नरके यांनी महायुती सरकारने केलेल्या विकासकामांचा अनुभव सांगत, जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करणाऱ्या उमेदवारांनाच मतदारांनी विजयी करावे, असे आवाहन केले.

“महायुती सरकारने ग्रामीण भागाचा चेहरा बदलण्याचे काम केले असून हीच विकासाची घडी पुढे नेण्यासाठी आपल्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या,” असे ते म्हणाले.या प्रसंगी पी. डी. पाटील, पी. एम. पाटील, नितीन हिर्डेकर, साताप्पा गायकवाड, सरदार पाटील, सज्जन पाटील, मधुकर पाटील, विष्णू पाटील, रामचंद्र तांदळे यांच्यासह शिंदे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाजारभोगाव चौकात झालेल्या सभेला नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली, तर उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत परिसर दणाणून गेला. या प्रचार सभेमुळे बाजारभोगाव परिसरात शिंदे सेनेच्या उमेदवारांची हवा अधिकच मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


