
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
कोल्हापुर – प्रत्येक माणसाची एकच इच्छा आहे जन्म कुठेही होऊ दे परंतु मृत्यु हा कोल्हापुरात झाला पाहिजे.सध्या कोल्हापूर शहरातील स्मशानभूमीमध्ये असलेल्या शेणी टंचाईच्या बातम्या आपण वेगवेगळ्या वर्तमानपत्र, टीव्ही चॅनलवर पाहतआहोत.कोल्हापूर, महानगरपालिकेच्या वतीने राबवलेल्या जाणाऱ्या मोफत अंत्यविधीसाठी शेणी कमी पडत असल्यामुळे मंगळवार पेठेतील रहिवाशी श्री राजेश विलासराव वायचळ यांनी आपले वडील कै. विलासराव लक्ष्मण वायचळ यांच्या स्मरणार्थ आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस २१,१११ शेणी दान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. कोल्हापुरातील अनेक पेठांना नावीन्यपूर्ण महत्त्व आहे अशाच मंगळवार पेठेतील रहिवाशी श्री राजेश वायचळ हे गेली ३,वर्ष आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ पंचगंगा स्मशानभूमी दान करतात आजही त्यांनी पंचगंगा स्मशानभूमीतील महानगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे शेणी निदान करून आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.यावेळी श्रीमती मंगल वायचळ श्री राजेश वायचळ सौ सविता वायचळ कु.श्रुती वायचळ कु. श्रेय वायचळ शिवाजी यादव यांच्या कुटुंबातील सदस्य व महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

