
प्रतिनिधी प्रताप शिंदे
कोल्हापूर: गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संस्थेच्या माध्यमातून… गुरुकुल प्रज्ञा शोध परिक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे ६० विद्यार्थ्यांना मोफत ईस्ररो शैक्षणिक सहलीसाठी काल कोल्हापूर येथून रवाना झाले. दरम्यान आज त्या विद्यार्थ्यांना बेंगलोर येथील प्रसिद्ध नेहरू तारांगण , म्हैसूर येथील प्रसिद्ध राधाकृष्ण मंदीर , आधुनिक वैज्ञानिक उपकरणे प्रयोगशाळा, म्युझियम अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. हा शैक्षणिक दौरा चार दिवसांचा पुर्ण सर्व मुले काल कोल्हापूर येथे दाखल झाली.यावेळी गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक किरण चौगुले, व्यवस्थापक गौरी चौगुले व सर्व स्टाफ विद्यार्थी उपस्थित होते.



