
माननीय आशिष शेलार साहेब यांना मांडरे परिवार कडून चित्रनगरी येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनात मांडरे परिवाराकडून अशी मागणी केली आहे की स्वर्गीय नटसम्राट मांडरे बंधून नी जी चित्रनगरी ची जागा मिळवण्यापासून जी धडपड व समाजासाठी केलेली प्रामाणिकपणे काम व भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते झालेली आहे. त्यांचा चित्रनगरीमध्ये एक मोलाचा वाटा त्यांनी उचललेला होता.

तर हे सर्व कष्ट त्यांनी कोल्हापूरच्या मातीत कलाकार घडावा यासाठी केलेले होते. यासाठी मांडरे परिवाराकडून एक निवेदन दिले आहे त्यामध्ये नमूद केला आहे की चित्रनगरीला नाव देताना “सूर्यकांत मांडरे चित्रनगरी” असे मिळावे…मांडरे परिवारांनी माननीय आशिष शेलार साहेबांचं अभिनंदन करून नटसम्राट स्वर्गीय सूर्यकांत मांडरे यांची शंभरावी जन्मशताब्दी जी राज्य सरकारने केली त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानले….यावेळी उपस्थित मांडरे परिवारातले स्मिता सावंत मांडरे पृथ्वीराज मांढरे युवराज मांडरे व संयोगिता मांडरे हे सर्वजण त्यांची सख्खे नातवंड आहे.
