
प्रतिनिधी श्रीकांत शिंगे
डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान संवर्धन समिती कसबा बावडा कोल्हापूर या समितीच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले समितीच्या कार्यकर्त्यांनी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी डॉ आंबेडकर उद्यान मध्ये 151 झाडे लावण्याचा निर्णय घेतला याबाबत समितीच्या कार्यकर्त्यांनी भूमिका मांडताना असे म्हणालेत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आम्ही 151 झाडे लावून त्यांना हरित अभिवादन करणार आहोत त्याचबरोबर इथून पुढे शाहू हरित अभियान हे अभियान आम्ही कायमस्वरूपी राबवणार आहोत.

आज कोल्हापूर जिल्हा जो काही सुजलाम सुफलाम दिसत आहे त्याला छत्रपती शाहू महाराज यांची दूरदृष्टी कारणीभूत आहे महाराजांनी राधानगरी धरण बांधले ज्योतिबा डोंगरावरती हजारो झाडे जतन केलेत अशी अनेक कार्य महाराजांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलीत महाराजांच्या या कार्यातूनच प्रेरणा घेऊन शाहू हरित अभियानाच्या माध्यमातून कसबा बावडा येथे जेथे जेथे वृक्षारोपण करता येईल तेथे तेथे वृक्षारोपण करून छत्रपती शाहू महाराजांना हरित अभिवादन करण्याचा आमचा मानस आहे त्याची सुरुवात आज आम्ही छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त करीत आहोत

या अभियानाची सुरुवात डॉक्टर आंबेडकर उद्यान येथे 151 झाडे लावून करण्यात आली आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या हस्ते व माजी आमदार ऋतुराज संजय पाटील साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी के मंजू लक्ष्मी आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका या उपस्थित होत्यात्याचबरोबर कसबा बावडा येथील सर्व माजी नगरसेवक श्रीराम सोसायटीचे सर्व संचालक व कसबा बावडा येथील सर्व शाहूप्रेमी जनता उपस्थित होती.







