माईंड टेक इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आयोजित..Life Engineering प्रोग्रॅम ला पालक व मुलं मुलींचा उदंड प्रतिसाद…

0
251

e

माईंड टेक इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आयोजित..Life Engineering प्रोग्रॅम ला पालक व मुलं मुलींचा उदंड प्रतिसाद…

प्रतिनिधी प्राध्यापिका मेघा पाटील कोल्हापूर प्रतिनिधी : माईंड टेक इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आयोजित..Life Engineering प्रोग्राम हॉटेल कोहिनूर स्क्वेअर दाभोळकर कॉर्नर सिग्नल जवळ कोल्हापूर रविवार दिनांक..22 जून 2025 रोजी संध्याकाळी चार वाजता संपन्न झाला.13 ते 20 वयोगटातील मुला मुलींसाठी हा सेमिनार प्रोग्रॅम घेण्यात आला. मुलांच्या योग्य वयात योग्य मार्गदर्शन, मुलांच्या सर्वांगीण विकासाचे तंत्र आणि आई वडील व विद्यार्थी यांचं नातं अधिक घट्ट कसे होणार या विषयावर महाराष्ट्राचे प्रसिद्ध लाईफ कोच व मोटिवेशनल ट्रेनर श्री भगवंत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना व पालक वर्गाला मार्गदर्शन केले. याचे आयोजन माईन टेक इन्स्टिट्यूट चे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख श्रीकांत शिंगे यांनी आयोजित केले होते. या सेमिनारसाठी पालक व मुला मुलींनी उदंड प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा हा एकमेव प्रोग्रॅम आयोजित केला होता.

महाराष्ट्राचे प्रसिद्ध लाईफ कोच व मोटिवेशनल ट्रेनर श्री भगवंत चव्हाण यांनी पालकांना व मुला मुलींना संवाद आत्मसन्मान व ध्येय याविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले ते यावेळी म्हणाले की,”आई-वडील आणि मुलांमधील संवादाचे महत्त्वआई-वडील आणि मुलांमध्ये प्रभावी संवाद असणे हे कुटुंबातील नातेसंबंध दृढ करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. संवादामुळे विश्वास, प्रेम, समजूतदारपणा आणि मानसिक बळ मिळते, जे मुलांच्या सर्वांगीण – मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक – विकासासाठी खूपच महत्त्वाचे असते.”संवादामुळे मुलांमध्ये पालकांबद्दल विश्वास निर्माण होतो.मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास आणि त्यांचे ऐकले जात आहे हे समजण्यास मदत होते.संवादामुळे मुलांना त्यांच्या समस्या पालकांशी मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे समस्यांचे निराकरण करणे सोपे होते.संवादामुळे मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित होतात, जसे की ऐकणे, बोलणे आणि इतरांशी जुळवून घेणे.मुलांशी बोलताना नकारात्मक किंवा अपमानास्पद भाषा वापरणे टाळा.दररोज मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा, मग ते बोलणे, खेळणे किंवा फक्त एकत्र वेळ घालवणे असो.मुलांना राग, भीती किंवा दुःख यांसारख्या नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी मार्गदर्शन करा. कामाच्या व्यापमुळे अनेक पालक मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, ज्यामुळे संवाद कमी होतो.काही पालक मुलांशी बोलताना भीती किंवा संकोच अनुभवतात, ज्यामुळे संवाद कमी होतो. तंत्रज्ञानाचा वापर कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि संवाद सुधारण्यासाठी करा.कुटुंबासाठी वेळ काढा आणि मुलांशी नियमितपणे संवाद साधा.आई वडील आणि मुलांमधील आत्मसन्मान (self-esteem) हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. मुलांमध्ये सकारात्मक आत्मसन्मान वाढवण्यासाठी पालकांनी प्रेम, आधार आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मुलांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी देणे आणि त्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करणे महत्वाचे आहे. मुलांशी सकारात्मक संवाद साधणे, त्यांना प्रोत्साहन देणे, आणि त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करते. मुलांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी देणे, आणि त्यांना पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढवते. मुलांना त्यांच्या वयानुसार जबाबदाऱ्या देणे, त्यांना स्वतःच्या कामांची जाणीव करून देते आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करते. मुलांना स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यास शिकवणे, आणि त्यांना त्यांच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरित करणे. नकारात्मक विचार आणि भावनांवर मात करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्यास मदत करणे. असा हा संपूर्ण तीन ते चार तासाचा सेमिनार पालक व मुला मुलींच्या उदंड प्रतिसादामुळे यशस्वी संपन्न झाला.या कार्यक्रमा वेळी सुप्रसिद्ध लाईफ कोच मोटिवेशनल ट्रेनर श्री भगवंत चव्हाण यांचा सत्कार एसपी नाईन मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर चॅनलचे डायरेक्टर सागर पाटील यांचा सत्कार श्री रियाज मुरसल यांनी केला. या कार्यक्रमा वेळी माईंडटेक चे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकांत शिंगे,एसपी नाईन निर्भय वुमन असोसिएशनच्या डायरेक्टर मेघा पाटील, श्री.माणिक पाटील,संस्थापक जीनियस पब्लिक स्कूल रियाज मुरसल,दीपक जाधव,अमोल पवार,अरविंद कांबळे, महेश बावडेकर,राजेंद्र कांबळे पालक वर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here