
प्रतिनिधी.: SP-9 न्यूज
चक्क मंत्रालयात मुलाखत आणि बोगस नियुक्तीपत्र.. सरकारी नोकरी लावण्याचा बहाण्याने एका फसवणुकीच्या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. आरोपींनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे नाव घेत गंडा घातला. आरोपींनी पीडित व्यक्तींना मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर नेऊन तथाकथित अधिकाऱ्याची भेट घालून देत मुलाखतीचा फार्सदेखील पार पडला. 2020 ते 2022 या कालावधीतील हे रॉकेट आता उघडकीस आले आहे. सुरेश धमगाये( 41 गोरेवाडी वस्ती ) यांच्या तक्रारीनंतर हा प्रकार पुढे आला. लॉरेन्स हेनरी त्याची पत्नी शिल्पा हेनरी, विजय पाटणकर आणि नितीन साठे अशी आरोपींची नावे आहेत. लॉरेन्स ने सहा महिन्यात सरकारी नोकरी लावून देण्याचे आम्हीच दाखवले. त्यासाठी 12 लाखाची मागणी केली. धमगाये यांनी त्याला सहा लाख 89 हजार रुपये दिले. लॉरेन्स ने मंत्रालयात नितीन साठे नावाचा सचिव दर्जाचा अधिकारी मित्र असल्याचा दावा केला. त्यानंतर मुलाखतीसाठी दमगाय यांना मुंबईत बोलावून मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर नितीन साठे नावाच्या तथाकथित अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली. साठेने त्यांची मुलाखत घेतली. दम गाय यांना नियुक्तीपत्रही दाखविले. व शारीरिक चाचणी द्यायची असल्याचे सांगितले. मात्र आरोपींनी नोकरी लावून दिली नाही.