
*महिला सुरक्षा ही प्रत्येक सामाजिक घटकाची जबाबदारी – श्री विनायक चौगुले,संरक्षण अधिकारी करवीर*
रतिनिधी श्रीकांत शिंगे
कोल्हापूर : समाजशास्त्र विभाग महावीर महाविद्यालय कोल्हापूर व महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने,’महिला व बालसुरक्षा जागरूकता अभियान’ अंतर्गत महिला सुरक्षा विषयक कायदे, बालकल्याण, सखी वन स्टॉप सेंटर, बालविवाह, पोकसो कायदा अश्या विविध विषयासंबंधी विद्यार्थ्यांच्या मध्ये जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली यावेळी करवीर चे संरक्षण अधिकारी श्री विनायक चौगुले यांनी असे प्रतिपादन केले की ‘ महिला सुरक्षा ही सर्व समाजाची जबाबदारी आहे, तसेच सर्वांनी मिळून महिला सुरक्षित राहतील असे सामाजिक वातावरण तयार करणे आवश्यक आहे ‘ सहाय्यक संरक्षण अधिकारी रानिता चौगुले, सखी वन स्टाफ सेंटरच्या प्रमुख निलम धनवडे, सामाजिक कार्यकर्ते मा. महेंद्र कांबळे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. गोमटेश्वर पाटील होते त्यांनी समाजातील महिलाविषयक समस्यांचा विद्यार्थिनी अभ्यास करावा असे आवाहन केले. या उपक्रमाचे आयोजन डॉ.अंकुश गोंडगे,कॅप्टन उमेश वांगदरे, डॉ.संदीप पाटील, प्रा.स्नेहल घोरपडे यांनी प्र प्राचार्य डॉ.गोमटेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले.यावेळी डॉ.शरद गायकवाड, डॉ.संजय ओमासे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते