GK : एक साप दुसऱ्या सापाला डसला तर काय होईल? रंजक आहे यामागची कहाणी, पाहा

0
105

Snake Facts : साप हा जगातील सर्वात विषारी प्राणी मानला जातो. काही साप इतके विषारी असतात की ते माणसाला चावल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, एका सापाने (Snake) दुसऱ्या सापाला दंश केल्यास काय होईल?

तो साप मरेल की नाही? आज याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

सापाचं विष एकमेकांत पसरेल की नाही?

एका सापाने दुसऱ्या सापाला चावल्यास काय होईल? त्याचं विष दुसऱ्या सापात मिसळेल का? या प्रश्नावर रिसर्चगेट साईट म्हणते की, याचं उत्तर होय आणि नाही दोन्ही आहे. किंबहुना, भांडणाच्या वेळी किंवा संभोगाच्या वेळी त्याच प्रजातीचा साप दुसऱ्या सापाला चावला तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. याचं कारण असं की, साप त्यांच्या स्वतःच्या प्रजातीच्या विषापासून संरक्षित किंवा रोगप्रतिकारक असतात. एकाच जातीच्या सापांमध्ये मारामारी आणि चावण्याच्या अशा घटना घडत असतात, पण यातून ते मरत नाहीत.

सापांसाठी इतर प्रजातींचे विष धोकादायक

मिळालेल्या माहितीनुसार, एखाद्या सापाला दुसऱ्या जातीच्या विषारी सापाने दंश केल्यास त्याचा परिणाम नक्कीच होतो. तथापि, तज्ञ म्हणतात की हा प्रसंग अत्यंत दुर्मिळ आहे, जेव्हा एका जातीचा साप दुसऱ्या प्रजातीच्या सापाशी लढतो आणि दोघेही एकमेकांना चावतात. परंतु वेगवेगळ्या प्रजातींचे दोन विषारी साप एकमेकांना चावल्यास दोघेही एकमेकांच्या शरीरात विष सोडतात, हे दोन्ही सापांसाठी घातक ठरते आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, साप त्यांच्या प्रजातीत विषापासून प्रतिकारक असतात. पण इतर प्रजातींचे विष त्यांच्यासाठीही धोकादायक आहे. सापांच्या ग्रंथींमध्ये असलेले विष वेगवेगळ्या प्रजातींमध्ये कमी अधिक पातळीवर तीव्र असते.

संशोधन काय म्हणते?

नॉर्दर्न कोलोरॅडो विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्राध्यापक आणि विषारी सापांचे तज्ज्ञ स्टीफन मॅकेसी यांनी सांगितलं की, एका जातीच्या सापांच्या रक्तात प्रतिपिंडे फिरतात. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या विषाचा किंवा त्यांच्याच प्रजातीच्या इतर सापांच्या विषाचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. उदाहरणार्थ, किंग कोब्रा आणि भारतीय कोब्रा एकमेकांना चावल्यास दोघांचे विष एकमेकांना नक्कीच मारेल. कारण चावल्यास दोघेही एकमेकांच्या शरीरात भरपूर विष टाकतील आणि ते वेगवेगळ्या प्रजातींचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here