SP9 कोकरुड/प्रतापराव शिंदे
स्वराज्य फौंडेशन, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ बिळाशी ता. शिराळा यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित जयदीप व प्रविण डाकरे संकल्पित गर्जा महाराष्ट्र माझा हा पारंपारिक लोककला आणि शिवरायांच्या विषयी आधारित असणाऱ्या कार्यक्रमास बिळाशी तसेच परिसरातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन उपवनसंरक्षक राहुल पाटील, माजी उपसभापती आनंदराव पाटील, निनाईचे संचालक बाजीराव पाटील, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परिट, प्रचितीचे संचालक एस. वाय. यमगर, सरपंच सुजाता देशमाने, उपसरपंच विजय रोकडे आदींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांत गणेश वंदन, वासुदेव, पोतराज, सतांची वारी, संत बाळूमामा, पहाटेचे भक्ती गित, लावणी, धनगरी गजनृत्य, गौरीचे गित या बहारदार लोकगीतां बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी उपवनसंरक्षक राहुल पाटील म्हणाले की, युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचर विचारातून प्रेरणा घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य टिकवून ठेवले पाहिजे.
मुलगा- मुलगी भेदभाव न मानू नये. ग्रामीण कथाकार बाबासाहेब परिट म्हणाले की, आपल्या गावासाठी चांगले विचार देणारे प्रशासनातील आदर्श व्यक्तिमत्व राहुल पाटील याचे काम कौतुकास्पद आहे.
या कार्यक्रमास स्वराज्य फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. एन. के. पाटील,माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका संगिता साळुंखे, आदर्शवत माता छायाताई पाटील, तेजस्विनी पाटील, विशाल नायकवडी, दिलीप कुंभार, दत्तात्रय शिपेकर, ग्रामपंचायत सदस्य विकास पांढरे, विनायक पाटील, संतोष पाटील, मुख्याध्यापक भगवान पाटील, आनंदा पाटील आदींसह बिळाशी गावातील प्रमुख पदाधिकारी, स्वराज्य फौंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘ गर्जा महाराष्ट्रात माझा’ कार्यक्रमाचे जयदीप व प्रविण डाकरे यांचा सत्कार उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा पाटील यांनी केले.