विवेकानंद कॉलेजमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
90

प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

कोल्हापूर, दि. 26 :
आजच्या युवकांनी राष्ट्रऐक्याच्या भावनेतून देशाला प्रगतीपथावर नेले पाहिजे. देशासाठी लढणाऱ्या शूरवीर व स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळेच आपल्याला स्वातंत्र्य लाभले आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व मानवतेचा संदेश देणाऱ्या भारतीय संविधानामुळे देशाला सामाजिक सुरक्षितता, सहिष्णुता व स्थैर्य प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.ते विवेकानंद कॉलेजमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, तसेच संस्था परिसरातील डॉ. बाबुजी साळुंखे इंजिनिअरिंग कॉलेज, डॉ. बाबुजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते.

मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी शानदार परेड संचलन व प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी सेवानिवृत्त होणारे कर्मचारी, पीएच.डी. पदवी प्राप्त, सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण, पुस्तक लेखक, प्रकाशक व पेटंट प्राप्त प्राध्यापक तसेच गुणवंत प्रशासकीय सेवकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती प्रा. विश्वंभर कुलकर्णी व श्री. सदानंद दुर्गुळे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना विभाग प्रमुख प्रा. डॉ. विकास जाधव, कॅप्टन सुनिता भोसले, लेफ्टनंट जे. आर. भरमगोंडा, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, रजिस्ट्रार श्री. सचिन धनवडे व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी केले.कार्यक्रमास संस्था परिसरातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील व प्रा. समीक्षा फराकटे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. कविता तिवडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here