रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची आहे,वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट

0
125

कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील

अजित पवार गटात असलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा गौप्यस्फोट केला.आहे. शरद पवार गटात असलेले राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे,

असे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदत म्हटलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

रोहित पवार हे ‘साहेबांचा संदेश’ या कार्यक्रमाअंतर्गत राज्यव्यापी दौरा करत आहेत. आज (२४ ऑगस्ट ( कोल्हापुरात आहेत. यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

१९९८ मध्ये हसन मुश्रीफ यांना संधी देवू नये, असा अनेक नेत्यांचा आग्रह होता. पण शरद पवार यांनी हा विरोध डावलून वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांना संधी दिली. पण आता एमआयडीसीमध्ये हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि नातेवाईक अडचणी निर्माण करत आहेत. असे रोहित पवार म्हणाले. यावर हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.

रोहित पवार नवखे आहेत. त्यांना तिकडे अजित पवारांची जागा घ्यायची आहे. ते कशासाठी धाडस करत आहेत. कोल्हापुरात सहा आमदार होते आता कमी झाले.

पुण्यात देखील अशी परिस्थिती झाली आहे. आरोप करायला जागा नसल्याने ते असे आरोप करतात. मला १९९८ मध्ये कुणाचा विरोध होता हे जाहीरपणे सांगावे. मंडलिक साहेब तर माझ्याच सोबत होते, असे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.शरद पवार यांची उद्या २५ ऑगस्ट ला कोल्हापुरात दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे.

यावर वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पवार साहेबांना एवढ्या छोट्या मैदानात आणायला नको होते. त्या मैदानात पाच हजार लोक बसू शकतील. त्यांच्या सभेला गर्दी व्हावी याच आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

शरद पवार यांनी अजित पवार गटाला फोटो वापरला तर कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. यावर देखील वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, पहिल्यांदा कुणीही कोर्टात जाणार नाही हे ठरले होते. मात्र फोटोवरून पवार साहेब कोर्टात जाणार असेल तर काय करणार?. पाच जुलैचे अजितदादांचे भाषण नीट ऐका त्यांनी स्पष्ट केले आहे की आमचा पक्ष एकच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here