Facebook आणि Instagram का बंद झालं होतं?; कंपनीने दिलं ‘हे’ उत्तर

0
54
Facebook आणि Instagram का बंद झालं होतं?; कंपनीने दिलं 'हे' उत्तर

मंगळवारी Meta च्या दोन प्रमुख सर्व्हिसेस कार्यरत नव्हत्या. फेसबुक आणि इन्स्टाग्राम काल रात्री अचानक ठप्प झालं. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सेवेवर फक्त भारतातच नाही तर जगभरात परिणाम झाला.

युजर्स इतर प्लॅटफॉर्मवर त्यांची सेवा बंद झाल्याबद्दल तक्रार करत होते.

कोट्यवधी युजर्सना त्यांच्या फेसबुक अकाऊंटचा एक्सेस मिळत नव्हता. इन्स्टाग्रामवरील फीड अपडेट होत नव्हतं किंवा युजर्स रील प्ले करू शकत नव्हते. जवळपास तासभर ही स्थिती कायम होती. मात्र, रात्री उशिरा कंपनीने आपली सेवा पूर्ववत केली.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सेवा का बंद होत्या, असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे. आपलं अकाऊंट अचानक हॅक झालं आहे की काय अशी भीती अनेकांना वाटली. पण सत्य वेगळं होतं, मेटा सर्व्हिसस बंद होण्याचे कारण म्हणजे तांत्रिक समस्या. मात्र, कंपनीने या समस्येबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही.

Down Detector वर हजारो लोकांनी वेबसाइट्स डाऊन झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मेटाचे स्पोकपर्सन अँडी स्टोन यांनी सांगितले की, मंगळवारी ही समस्या दूर झाली आहे. सर्व्हिसेस डाऊन असल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे.

स्टोन यांनी लिहिलं की, “आज सकाळी (अमेरिकेच्या वेळेनुसार) तांत्रिक समस्येमुळे लोकांना आमच्या काही सर्व्हिसेस एक्सेस करण्यात अडचण येत होती. आम्ही या समस्येचे शक्य तितक्या लवकर निराकरण केलं आहे. लोकांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”

फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन होताच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर युजर्सचा महापूर आला. फेसबुक डाउन, इन्स्टाग्राम डाउनशी संबंधित कीवर्ड या प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग सुरू झाले. लोक सतत मीम्स शेअर करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here