कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका? अलमट्टीचा पाणी साठा १०० री पार , कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली

0
108

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा

कर्नाटक: अलमट्टी जलाशयात एक जुलै रोजी केवळ ३७ टीएमसी पाणी जमा झाले होते. तर बुधवार दि १७ जुलै रोजी तब्बल ९९.३१७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जलाशय ८०.६९ टक्के भरले आहे. म्हणजेच केवळ १६ दिवसांत जलाशयात ६२ टीएमसी पाणी साठा झाला आहे. महाराष्ट्रातील पावसामुळे आलमट्टीत पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी ९२ हजार क्युसेक इतकी आवक होती, तर ६० हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी भागातील नद्यांतील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे.आलमट्टीच्या १४ दरवाजांतून वीजनिर्मितीसाठी ३५ हजार क्युसेक आणि विसर्ग म्हणून २५ हजार क्युसेक असे एकूण ६० हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. महाराष्ट्रात उगम पावलेल्या नद्यांतून वाहून येणारे पाणी चिक्कोडी भागातील विविध नद्यांतून कृष्णा नदीत मिसळून थेट आलमट्टी जलाशयात जात आहे. त्यामुळे या धरणाच्या बॅक वॉटरचा तडाखा बसत आहे.गेल्या काही वर्षांपासून पूरस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्रातील अधिकारी कर्नाटकच्या आलमट्टी धरणातील आवक आणि विसर्गावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नियुक्त केले आहेत. तर, कर्नाटकचे अधिकारी महाराष्ट्रातील कोयना धरणावर नियुक्त केले आहेत. त्यामुळे नियोजनाचा परिणाम म्हणून अधिक पाऊस होऊनही पुराचा फटका बसलेला नाही.यंदा जूनमध्ये पावसाने चांगली साथ दिलेली नाही. काहीसा पाऊस झाला असला तरी जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागात पावसाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्रातील धरणांतून पाणी सोडल्यास व पाऊसही संततधार राहिल्यास आणि आलमट्टीतून विसर्ग नसल्यास नद्यांना पाणी वाढून पूरस्थिती निर्माण होत होती. यंदा पाऊस कमी असल्याने व महाराष्ट्रातील धरणांत पाणीच नसल्याने विसर्गाचा प्रश्नच आलेला नाही. त्यातच काही दिवस जोरदार पाऊस झाल्याने वाहून येणारे पाणी थेट आलमट्टीला मिळत आहे. परिणामी केवळ पंधरा दिवसांत आलमट्टी धरण शंभर टीएमसीपर्यंत भरत आले आहे.बुधवारी आलमट्टीत ९९.३१७ टीएमसी पाणीसाठा झाला. १२३ टीएमसी क्षमता असलेले आलमट्टी धरण पाऊस नसतानाही गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसामुळे लवकर भरत आहे. त्यामुळे नंतर पाऊस वाढल्यावर जादा विसर्ग करावा लागला आहे. त्यातूनच गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये काही वेळेला दोन लाख क्युसेकपर्यंत विसर्ग करावा लागला होता. तो आतापर्यंतचा सर्वाधिक विसर्ग ठरला आहे. आलमट्टीच्या बॅक वॉटरचा फटका चिक्कोडी विभाग आणि महाराष्ट्राला बसत असल्याचाही आरोप आहे. या धरण क्षेत्रात पाऊस नसतानाही त्या भागाला पाणी मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here