विशाळगडावर झालेल्या घटनेसंदर्भातील वादग्रस्त पोस्ट प्रकरणी नाशिकमध्ये युवकाला अटक

0
49

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

नाशिक : नाशिक पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेल्या घटनेसंदर्भातील सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका युवकाला गुरुवारी १८ जुलै रोजी अटक केली आहे. या पोस्टमुळे स्थानिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत संबंधित युवका विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here