विवेकानंद कॉलेजमध्ये ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन

0
17

राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण — देशभक्तीच्या भावनेने महाविद्यालय दुमदुमले

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात “वंदे मातरम” या राष्ट्रीय गीताला अपूर्व स्थान लाभले असून, ते देशभक्ती, स्वाभिमान आणि बलिदानाचे प्रतीक आहे. या गीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे सामूहिक वंदे मातरम गायनाचा प्रेरणादायी उपक्रम पार पडला.

महाविद्यालयातील ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी एकत्र येत उत्साहपूर्ण वातावरणात “वंदे मातरम”चे एकत्रित गायन केले. सभागृहात देशभक्तीची भावना दुमदुमली आणि उपस्थितांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची लहर पसरली.

हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस. आणि एन.सी.सी. विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. पी. आर. बागडे, डॉ. विकास जाधव, प्रा. संदीप पाटील, ले. जे. आर. भरमगोंडा, मे. एस. एम. भोसले, रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे, तसेच ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे स्टाफ सेक्रेटरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

महाविद्यालय परिसरात देशभक्तीचे सूर घुमत असताना विद्यार्थ्यांनी “वंदे मातरम”च्या जयघोषाने वातावरण भारावून टाकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here