एम.डी. ड्रग्स प्रकरणात एलसीबीची मोठी कारवाई दोन जणांना अटक, साडेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त उचगाव येथे मेफेड्रोन (MD) विक्रीसाठी आलेल्या इसमांवर छापा

0
22

प्रतिनिधी :पांडुरंग फिरिंगे

अमली पदार्थांचा वाढता व्यापार आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने उचगाव (ता. करवीर) येथील राष्ट्रीय महामार्ग लगतच्या सर्व्हिस रोडवर छापा टाकून दोन इसमांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कब्जातून १२.२३ ग्रॅम मेफेड्रोन (MD) या अंमली पदार्थासह एकूण ₹२,३६,१५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार साहो यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार साहो यांच्या देखरेखीखाली पार पडली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उचगाव येथे एक इसम जिक्सर मोटारसायकलवरून MD विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला असता इसम अभिषेक कुशाजी मोरे (२३, रा. जाधववाडी, कोल्हापूर) हा दुसऱ्या इसमास विवेक तानाजी पोवार (२८, रा. उचगाव) विक्री करीत असताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले.छाप्यात दोघांकडून१२.२३ ग्रॅम मेफेड्रोन (MD)तीन मोबाईल हँडसेटजिक्सर मोटारसायकल (MH-03-BX-6739)असा एकूण ₹२,३६,१५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्राथमिक चौकशीत आरोपी विवेक पोवार याने हा अंमली पदार्थ नेरूळ, मुंबई येथून आणल्याचे कबूल केले आहे. दोघांनाही मुद्देमालासह गांधीनगर पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले असून पुढील तपास तेथील पोलीस करीत आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, वैभव पाटील, गजानन गुरव, शिवानंद मठपती, संतोष बरगे, समीर कांबळे, विशाल खराडे, राजू कोरे, परशुराम गुजरे, अमित मर्दाने व प्रदीप पाटील यांनी एकत्रितपणे केली.➡️ एलसीबी कोल्हापूरचा अंमली पदार्थांविरोधातील आणखी एक प्रभावी धडक कारनामा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here