कोल्हापूर प्रतिनिधी :**कोल्हापुरातील सांस्कृतिक ओळख असलेले *संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह* 8 ऑगस्ट 2024 रोजी भीषण आगीत जळून खाक झाले. या आगीत केवळ इमारतीचे नव्हे, तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनाचे, कलाकारांच्या स्वप्नांचे आणि रसिकांच्या भावना यांचेही प्रचंड नुकसान झाले.आगीच्या घटनेनंतर नाट्यगृहाचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणीची कामे सुरू झाली असली तरी आज, सुमारे दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही या कामाच्या गतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कामकाजातील ढिसाळपणा व असमाधानकारक स्थितीरंगकर्मींच्या म्हणण्यानुसार, नूतनीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने चालले आहे. प्रशासन, ठेकेदार आणि कन्सल्टंट यांच्यात कोणताही समन्वय दिसून येत नाही. अनेकदा चुकीच्या पद्धतीने कामे सुरू केली जात असून, त्यावर रंगकर्मींकडून निदर्शनास आणून दिल्यानंतरच दुरुस्ती केली जाते.”या नूतनीकरण प्रक्रियेत किमान तीन महिने काम पूर्णपणे ठप्प होते. आजच्या घडीला सुद्धा साइटवर एकही कामगार नाही. ठेकेदार आणि कन्सल्टंट हे भेटीसाठी वेळ देऊनही येत नाहीत,” असे असंतोषाचे सूर रंगकर्म्यांकडून व्यक्त होत आहेत.विकास आढावा बैठकीतून नाट्यगृह ‘गायब’!दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेत जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक पार पडली.मात्र या बैठकीत *संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाचा कोणताही उल्लेखच झाला नाही*, ही गोष्ट कलाविश्वासाठी अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक आहे.”या दुर्लक्षामुळे स्पष्ट होतं की कोल्हापुरातील सांस्कृतिक वारशाबद्दल आणि कलाकारांविषयी प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींना आता कसलंच देणंघेणं उरलेलं नाही,” अशी टीका रंगकर्मी व कलावंतांनी केली आहे. आंदोलनाची घोषणा – पत्रकारांना आवाहनया पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील रंगकर्मी आणि सांस्कृतिक संस्थांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.*मंगळवार, दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता नाट्यगृह परिसरात* सर्व पत्रकार बंधू-भगिनींना प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन, सुरू असलेल्या कामाची दुर्दशा पाहण्यासाठी आणि माध्यमांच्या माध्यमातून आवाज उठवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. “राजर्षी शाहू छत्रपतींचा ठेवा वाचवूया!”“संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे केवळ इमारत नाही, तर कोल्हापुरच्या सांस्कृतिक आत्म्याचं प्रतीक आहे. हा राजर्षी शाहू छत्रपतींच्या वारशाचा ठेवा आहे. त्याचं जतन आणि पुनर्निर्माण हे केवळ प्रशासनाचं नव्हे, तर संपूर्ण समाजाचं कर्तव्य आहे,” असे मत रंगकर्मी आंदोलन समितीने व्यक्त केले आहे.
Home Uncategorized कोल्हापुरातील रंगकर्म्यांचा संताप – संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामातील ढिसाळपणा व...

